ग्रामीण सायबर पोलिसांनी राज्यात पटकाविला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 04:21 PM2020-02-01T16:21:43+5:302020-02-01T16:24:53+5:30

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली.

Number one ranked rural cyber police in the state | ग्रामीण सायबर पोलिसांनी राज्यात पटकाविला प्रथम क्रमांक

ग्रामीण सायबर पोलिसांनी राज्यात पटकाविला प्रथम क्रमांक

googlenewsNext
ठळक मुद्दे एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यश

नाशिक : ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर गुन्ह्यांमधील रोख रक्कम पुन्हा मिळविण्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सायबर पोलिसांनी २०१९ साली आॅनलाईन सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यांमधील तब्बल १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा वसूल करण्यास यश मिळविले. तसेच सायबर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये हे पोलीस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.
पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. इमारतीत सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे. या पोलीस ठाण्याचेप्रमुख निरिक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरिक्षक कल्पेश दाभाडे यांच्यासह नाईक सोनाली पाटील, आरती पारधी, प्रमोद जाधव, परिक्षीत निकम, प्रकाश मोरे, सुनील धोक्रट, विकास टेकुळे, सरिता अक्कर, प्राजक्ता सोनवणे यांचा चमू कार्यरत आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणूकीचा छडा लावत या पथकाकडून २०१९ साली तब्बल दाखल २५ गुन्ह्यांमधील १६ लाख ५० हजारांच्या रकमेपैकी एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली गेली. यामुळे ज्या फिर्यादींची फसवणूक झाली होती, त्यांनाही मोठा दिलासा मिळाला. आॅनलाइन फसवणूकीचा प्रकार लक्षात घेत त्यानुसार आपले कौशल्य वापरू न कायद्याचे निरिक्षण नोंदवित काही गुन्ह्यांत संबंधित बॅँकांना जबाबदार धरत त्यांच्या ग्राहकांची फसवणूकीत गेलेली रक्कमदेखील सायबर पोलिसांनी मिळवून दिली आहे, असे अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. सायबर पोलिसांच्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आॅनलाइन पेमेंट अ‍ॅप्लीकेशनचा वाढता वापर अणि आॅनलाइन फसवणूकीचे वाढते प्रमाण यामुळे २०१९साली २५ गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात जिल्ह्याच कानाकोपऱ्यातून दाखल झाले.

३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यश
ग्रामीण सायबर पोलीसांना मागील तीन वर्षांमध्ये दाखल १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले. त्यामुळे हे पोलीस ठाणे राज्यात गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चौथ्या क्रमांकावर राहिले. २०१९ साली २५ पैकी १० तर २०१८मध्ये ३६पैकी १० आणि २०१७साली ४८पैकी केवळ १३ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिस यशस्वी झाले होते. मागील वर्षभरापासून सायबर पोलिसांच्या कामगिरीची आलेख अधिक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उंचावलेला आकडेवाडीवरून दिसून येतो.

Web Title: Number one ranked rural cyber police in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.