दिवाळीत बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 09:05 PM2020-11-23T21:05:00+5:302020-11-24T02:12:41+5:30
सायखेडा : दिवाळीच्या काळात अनेक जण पुणे, मुंबई, सुरत, नाशिक,बडोदा, नागपूरसह इतर महानगरातून तालुक्यात दाखल झालेत. प्रवासानंतर या नागरिकांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक होते, मात्र या नागरिकांनी चाचण्या टाळत अनेकांनी दुखणे अंगावरच काढल्याची दिसून आले.

नोकरी किंवा शिक्षणानिमित्त जिल्ह्यातील अनेक लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात वास्तव्यास आहेत. दिवाळीच्या काळात अनेक जण जिल्ह्यात परतले. कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी नियमानुसार अशा प्रवाशांनी कोरोनाची चाचणी करणे अपेक्षीत आहे, मात्र अनेकांनी प्रवासानंतर कोविड ओपीडीला भेट दिली नसल्याचे वास्तव आहे.
मध्यंतरी वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, खोकला आणि तापीची लक्षणे आढळूनही ते अंगावर काढल्याचे प्रकार घडले आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने या काळात चाचण्यांची संख्या वाढणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने दिवाळीच्या काळात चाचण्यांचे प्रमाण घटले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची असल्याने शक्यता असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. प्रशासनाकडूनही जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची नोंद करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वत: पुढाकार घेत आवश्यकती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.