सिन्नरला ऑक्सिजन खाटांची संख्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:31+5:302021-04-16T04:14:31+5:30
सिन्नर: रेमडेसिविर इंजेक्शनच्या नियोजनात बाह्य हस्तक्षेप खपवून घेणार नाही. प्रत्येक गरजू रुग्णांना रेमडेसिविर मिळाले पाहिजे व याबाबत पारदर्शी ...
सिन्नर: रेमडेसिविर इंजेक्शनच्या नियोजनात बाह्य हस्तक्षेप खपवून घेणार नाही. प्रत्येक गरजू रुग्णांना रेमडेसिविर मिळाले पाहिजे व याबाबत पारदर्शी नियोजन करण्याच्या सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्या. दरम्यान, ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविण्यासंदर्भात त्यांनी तातडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बेडची क्षमता ८० खाटांपर्यंत नेण्याचा निर्णय झाला.
खासदार गोडसे यांनी सिन्नरच्या कोविड ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन आढावा घेतला. रेमडेसिविरची आवश्यकता असलेले तालुक्यातील एकूण रुग्ण किती, उपलब्ध साठा व मागणी किती याची माहिती गोडसे यांनी घेतली. रेमडेसिविरची उपलब्धता, मागणी, गरजू रुग्णांची संख्या याची माहिती रुग्णालयाच्या बाहेर दररोज फलकावर लावण्याच्या सूचनाही गोडसे यांनी दिल्या. सहा खासगी कोविड सेंटर असली तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत तीनच रुग्णालयांची नावे असून त्यात सुधारणा करण्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना युवा नेते उदय सांगळे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, निलेश केदार, अनिल सांगळे, नगरसेवक शैलेश नाईक, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, गौरव घरटे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदी उपस्थित होते.
इन्फो
कर्मचारी भरती स्थानिक पातळीवर
रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या विचारात घेता कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे डॉ. लहाडे यांनी सांगितले. खासदार गोडसे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. कर्मचारी संख्या उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय घेण्याबाबत यावेळी सांगण्यात आले.
चौकट-
ऑक्सिजन बेडची संख्या वाढणार
रुग्णालयात ऑक्सिजन वाहिनी टाकण्यासाठी लगेचच काम सुरू करावे अशी सूचना खासदार गोडसे यांनी केली. याबाबत बनसोड यांनी संबंधित कामाबाबत लागणारे पैसे लगेच पाठविण्यात येतील. स्थानिक पातळीवर हे काम लगेच सुरू करावे असे सांगितले. त्यामुळे ऑक्सिजन वाहिनी टाकण्याचे काम लगेच सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ३५ खाटांना ऑक्सिजन वाहिनीची सुविधा आहे. त्याची क्षमता वाढून ८० खाटांपर्यंत पोहोचणार आहे. ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक असल्याची माहिती तहसीलदार कोताडे यांनी यावेळी दिली.
फोटो - १५ सिन्नर गोडसे
सिन्नर कोविड रुग्णालयात आढावा घेताना खासदार हेमंत गोडसे. समवेत माजी आमदार राजाभाऊ वाजे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव आदी.
===Photopath===
150421\15nsk_54_15042021_13.jpg
===Caption===
फोटो - १५ सिन्नर गोडसे सिन्नर कोविड रुग्णालयात आढावा घेताना खासदार हेमंत गोडसे. समवेत माजी आमदार राजाभाऊ वाजे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ वर्षा लहाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन बच्छाव आदि.