रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमांचे पालन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:28+5:302021-02-24T04:15:28+5:30
सिन्नरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीचा दर वाढत असल्याने नागरिकांनी मास्क वापरावा, सतत हात धुवावे व शारीरिक अंतर ...
सिन्नरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीचा दर वाढत असल्याने नागरिकांनी मास्क वापरावा, सतत हात धुवावे व शारीरिक अंतर राखावे, या त्रिसूत्रीचा वापर केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. याआधी प्रतिदिन सरासरी पाच ते सहा कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. मात्र, गत आठवड्यात रुग्ण संख्या वाढल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विविध प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, विवाह समारंभ करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही पदाधिकारी व प्रशासनाने केले आहे. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, आरोग्य सेवक आदींनी जनजागृती करून नागरिकांना सजग करावे. गावात उपाययोजना करताना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही आवाहन सभापती बर्के, उपसभापती कातकाडे, गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी केले आहे.