उपचारार्थी रुग्णसंख्या ३० हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:07+5:302021-04-05T04:13:07+5:30

नाशिक : जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ७४३ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या ...

The number of patients undergoing treatment is over 30,000 | उपचारार्थी रुग्णसंख्या ३० हजारांवर

उपचारार्थी रुग्णसंख्या ३० हजारांवर

Next

नाशिक : जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार ७४३ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या लाभार्थ्यांची संख्या ३० हजारांवर पोहोचली आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ६४२, चांदवड १ हजार ०३, सिन्नर ६००, दिंडोरी ५६५, निफाड १ हजार ८०३, देवळा ९५९, नांदगाव ५४७, येवला ३६४, त्र्यंबकेश्वर १९६, सुरगाणा १६९, पेठ ६७, कळवण ४२७, बागलाण १ हजार २०५, इगतपुरी ३७१, मालेगाव ग्रामीण ८६५ असे एकूण ९ हजार ७८३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १७ हजार ४७२, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९५८ तर जिल्ह्याबाहेरील २३२ असे एकूण २९ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ६३५ रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८२.२७ टक्के, नाशिक शहरात ८४.६३ टक्के, मालेगाव मध्ये ७५.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.०९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.५३ इतके आहे. नाशिक ग्रामीण १ हजार, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १६६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून २०९ व जिल्हा बाहेरील ७२ अशा एकूण २ हजार ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: The number of patients undergoing treatment is over 30,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.