प्लॅटफॉर्मचे तिकीट वाढताच भटक्यांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:01+5:302021-03-17T04:16:01+5:30
चौकट==== गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली संख्या गेल्या पाच दिवसात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दररोज ३०० ते ३५० प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ...
चौकट====
गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली संख्या
गेल्या पाच दिवसात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दररोज ३०० ते ३५० प्लॅटफॉर्म तिकीट विक्री होत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात दररोज प्लॅटफॉर्म तिकीट विक्री दररोज ५५० ते ६५० होत होती. प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढविल्याने नक्कीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना सोडविण्यास येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
चौकट====
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकीट पन्नास रुपये करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक जण दहा रुपयाचे प्लॅटफॉर्म तिकीट काढून दोन तास रेल्वे स्थानकावर दिवसा फिरण्यासाठी व रात्रीच्या वेळेला चहा पाणी घेण्यासाठी येत होते. मात्र आता प्लॅटफॉर्म तिकीट पन्नास रुपये करण्यात आल्याने रेल्वे स्थानकावर फिरणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
-आर. के. कुठार, प्रबंधक, नाशिकरोड रेल्वेस्थानक.