पिंपळगाव परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत यंदा घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:18 IST2020-08-23T21:50:55+5:302020-08-24T00:18:43+5:30
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदणी केली आहे, तर १२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ला पसंती दिली आहे.

पिंपळगाव परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत यंदा घट
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदणी केली आहे, तर १२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ला पसंती दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी नियमावली तयार केली आहे. या सूचनेनुसार पिंपळगाव व परिसरातील मंडळांनी उत्सवाच्या मंडपासाठी पिंपळगाव पोलीस ठाण्याकडून परवानगी मागितली आहे. मंडळांनी मंडपांचा आकार कमी करण्याबरोबरच उत्सवाचे दिवसही कमी करून साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. घरगुती गणेशोत्सवास प्रतिसादग्रामीण भागातही शंभरपेक्षा जास्त मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु यावर्षी कोरणामुळे असलेले निर्बंध व वाढती रु ग्ण संख्या बघता सार्वजनिक मंडळांची संख्या खूपच मर्यादित राहिली आहे. प्रत्येक गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आल्याने यावर्षी अनेक मंडळांनी गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे यंदा सार्वजनिकऐवजी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वांचाच भर राहिला आहे.पिंपळगाव बसवंत येथील नॅशनल हायवे मित्रमंडळाचा सर्वात मोठा गणपती असल्याने मोठी यात्रा भरते. तसेच विविध देखावे सादर करण्याची पन्नास वर्षांची मित्रमंडळाची परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनामुळे यात्रेची व मोठ्या देखाव्याची परंपरा खंडित झाली आहे. कोरोनाचे विघ्न टळावे, असे साकडे गनरायाला घातले आहे.
- गणेश बनकर, अध्यक्ष, नॅशनल हायवे मित्रमंडळ