सिन्नरला बाधितांची संख्या साडेपाचशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:49 PM2020-08-01T23:49:53+5:302020-08-02T01:25:20+5:30
सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरासह अनेक भागात लॉकडाऊन असतानाही रुग्णवाढीचा वेग कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात ३० रुग्ण वाढल्याने कोरोना बाधितांची संख्या साडेपाचशे पार होऊन ५७२ वर पोहचली आहे.
सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरासह अनेक भागात लॉकडाऊन असतानाही रुग्णवाढीचा वेग कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात ३० रुग्ण वाढल्याने कोरोना बाधितांची संख्या साडेपाचशे पार होऊन ५७२ वर पोहचली आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ७ असे एकुण 14 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. शहरातील झापवाडी येथे 29 वर्षीय युवक, उद्योग भवन येथे 50 वर्षीय पुरुष, विजयनगर येथे 44 व 49 वर्षीय पुरुष, गौतम नगर येथे 46 वर्षीय पुरुष, यशवंत नगर येथे 37 वर्षीय पुरुष तर इंदिरानगर येथे 67 वर्षीय महिला तर ग्रामीण भागात शहा येथे सर्वाधिक पाच रुग्ण आढळले आहेत. त्यात 8 व 11 वर्षीय मुली, 14 वर्षीय मुलगा, 27 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, कोनांबे येथे 60 वर्षीय महिला व माळेगाव मध्ये 45 वर्षीय पुरुष असे तालुक्यात एकुण 14 रुग्णांची भर पडली आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 31) शहरात 12 तर ग्रामीण भागात 4 असे तालुक्यात 16 कोरोनाबाधित आढळून आले. तालुक्यात एकुण 572 बाधितांची संख्या झाली असून 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 129 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. मोहन बच्छाव, डॉ. लहू पाटील, डॉ. निर्मला गायकवाड, डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.