जिल्ह्यात टॅँकरची संख्याही नऊने वाढली
By admin | Published: April 17, 2015 11:20 PM2015-04-17T23:20:02+5:302015-04-17T23:43:58+5:30
जिल्ह्यात टॅँकरची संख्याही नऊने वाढली
नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मारा सुरूच असला तरी कडक उन्हाची काहिलीही वाढू लागली असून, टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात असलेल्या टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या २१ वरून ३० झाली आहे.
एप्रिल सुरू होताच जिल्ह्णातील पाणीटंचाई असलेल्या गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवडाअखेर ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.
काल (दि.१७) अखेर जिल्ह्णात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात टॅँकरची संख्या- बागलाण- ४ गाव (२), चांदवड- २ (१), दिंडोरी- ० (०), देवळा- २ गावे- ५ वाड्या एकूण ७ (३), इगतपुरी- ० (०), मालेगाव- ० (०), नांदगाव- ८ गावे- ३९ वाड्या एकूण- ४७ (५), नाशिक- ० (०), निफाड- ० (०), पेठ- ० (०), सुरगाणा- ११ गावे- ५ वाड्या एकूण १६ (३), सिन्नर- ६ गावे- ५८ वाड्या एकूण-६४ (११), त्र्यंबकेश्वर- ० (०), येवला- १९ गावे- ५ वाड्या एकूण- २४ (५) अशा एकूण ५२ गावे व ११२ वाड्या मिळून एकूण १६४ गाव-वाड्यांना २६ शासकीय व ४ खासगी अशा एकूण ३० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)