पर्यटकांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:49+5:302021-03-14T04:14:49+5:30

हॉटेल व्यवसायिक अडचणीत नाशिक : मागील वर्षभरापासून नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याने पर्यटन स्थळ परिसरातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत ...

The number of tourists decreased | पर्यटकांची संख्या घटली

पर्यटकांची संख्या घटली

Next

हॉटेल व्यवसायिक अडचणीत

नाशिक : मागील वर्षभरापासून नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याने पर्यटन स्थळ परिसरातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावोगावचे अर्थचक्र थांबले

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावोगावचे आठवडेबाजार बंद झाल्याने या बाजारांमधील विक्रेत्यांची गैरसोय झाली आहे. त्यांचे संपूर्ण अर्थचक्र थांबले आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे.

भुरट्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त

नाशिक : शहरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या चोऱ्यांची पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिक चिंतीत झाले आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी त्याचबरोबर भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे

स्मार्ट सीटीच्या कामांमुळे व्यावसायिक त्रस्त

नाशिक : स्मार्ट सीटी योजनेअंतर्गत गोदाघाट परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे या परिसरात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचा व्यवसायावरही परिणाम होऊ लागला असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

गंजमाळ परिसरात घाणीचे साम्राज्य

नाशिक : शहरातील गंजमाळ परिसरात रस्त्यावर पसरलेल्या घाणीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. या कचऱ्यावर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे कचरा सर्वत्र पसरतो. महापालिकेने या परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक अडचणीत

नाशिक : शहरात पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. बऱ्याच महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने रिक्षाचालकांचा रोजगार सुरु झाला होता. मात्र, आता पुन्हा त्यांच्या व्यवसायावर गडांतर आले आहे.

लसीकरणाबाबत समाजमाध्यमांवर जनजागृती

नाशिक : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस दिली जात असल्याबाबत विविध संस्था संघटनांमार्फत आणि स्वयंसेवकांकडून समाज माध्यमांवर जनजागृती केली जात आहे. यामुळे अनेकांना लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती मिळत असल्याने लसीकरणाला ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

रामसेतुखाली दुर्गंधीचे साम्राज्य

नाशिक : गोदाघाट परिसरात बालाजी कोटजवळ रामसेतुखाली असलेले स्वच्छतागृह तोडण्यात आले असले तरी अनेक नागरिक याठिकाणी लघुशंकेसाठी जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या परिसरात दर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो. त्याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The number of tourists decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.