कर चुकवेगिरीकरिता ट्रॅव्हल्सचालकाकडून एक क्रमांक दोन बसेसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:11 PM2017-08-24T22:11:51+5:302017-08-24T22:12:17+5:30
नाशिक : शासनाचा कर चुकविण्यासाठी एका ट्रव्हल्स वाहतूकदाराने चक्क एक क्रमांक दोन बसेसवर वापरून फसवणूक करत असल्याचा प्रकार भद्रकाली पोलिसांनी कन्नमवार पुलाजवळ उघडकीस आणला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भद्रकाली पोलिसांनी सापळा रचला. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास (आर.जे.२३ पीए.४८०१) या क्रमांकाने दोन ट्रॅव्हल्स बस चालवित असल्याचे समजले. दरम्यान, या क्रमांकाची बस आली असता पोलिसांनी ती रोखली व चौकशीसाठी ताब्यात घेतली. यावेळी या बसचा चेसीस व इंजिन क्रमांकाची खात्री केली. दरम्यान, पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनक्रमांक व चेसीस-इंजिन क्रमांकाची खात्री केल्यास सदर क्रमांक खोटा व बनावट असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा बसचालक सावरमल भगीरथमल बलाई व ट्रॅव्हल्समालक संतोषदेवी रामदेवराव व त्यांचा मुलगा अशोककुमार यांनी शासनाचा कर चुकविण्यासाठी बसला खोटी व बनावट क्रमांकाची पाटी लावून वाहतूक व्यवसाय केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.