जिल्ह्यात २९ हजारांनी वाहन संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:19+5:302021-04-08T04:15:19+5:30

एकीकडे वाहनांची खरेदी व प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी कमी झाली असली तरी, वाहनाला आकर्षक क्रमांक नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला ३ ...

The number of vehicles in the district decreased by 29,000 | जिल्ह्यात २९ हजारांनी वाहन संख्या घटली

जिल्ह्यात २९ हजारांनी वाहन संख्या घटली

Next

एकीकडे वाहनांची खरेदी व प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी कमी झाली असली तरी, वाहनाला आकर्षक क्रमांक नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला ३ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यंदा परिवहन विभागाने दिलेल्या ३७८.५१ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी जवळपास २४२.७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यंदा वर्षभरात शालेय बस, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा संख्येत लक्षणीय घट झाली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णवाहिका संख्या १ ने घटली, तर शेतकी ट्रेलर संख्या ५२४ ने वाढली आहे, तर सर्व प्रकारच्या दुचाकींमध्ये २४ हजार ६२३ वाहनांची संख्या घटली आहे. गेल्या वर्षी दुचाकी संख्या ७३,६६२ होती, तर यावर्षी ४९,०१९ एवढ्या दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे.

एप्रिल २० ते मार्च २१ या वर्षभरात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व इतर वाहने, अशा ७१ हजार ६१२ वाहनांची नोंदणी झाली होती, तर गेल्या वर्षी २०२० मध्ये १ लाख ५५८ वाहन नोंदणी झालेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची वाहन नोंदणी संख्या लक्षात घेतली, तर या वर्षात २८ हजार ९४६ वाहनांची संख्या घटली आहे. गेल्या वर्षात ३,०७१ ऑटोरिक्षा दाखल झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी ७५८ ऑटोरिक्षांची नोंद होऊन २,२३१ ने रिक्षांची संख्या घटली आहे. शालेय बसची संख्यादेखील यावर्षी घटली असून, गेल्या वर्षी ५९० बसची नोंदणी झाली होती. यंदा संख्या १४ वर आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ९५ टक्के घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीपेक्षा ट्रॅक्टर आणि शेतकी ट्रेलरची संख्या वाढली आहे. ट्रॅक्टर ३,५८६ होते, यावर्षी संख्या ५,१०९ झाली, म्हणजे दीड हजाराने वाढले, तर शेतकी ट्रेलर यावर्षी ९५४ आहेत. गेल्यावर्षी ४३० होते, ते आता सव्वापाचशेने वाढले आहेत.

इन्फो===

कोरोनाचा परिणाम

गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने जवळपास दोन ते तीन महिने कार्यालय बंद होते. शासनाने यावर्षी जवळपास

३७८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी सुमारे २४२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट साधले आहे, तर आकर्षक पसंती क्रमांकाच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

-भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: The number of vehicles in the district decreased by 29,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.