जिल्ह्यातील बळींची संख्या १९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:20 PM2020-05-07T23:20:17+5:302020-05-07T23:47:12+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी (दि. ७) आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मालेगावचे चार रुग्ण हे यापूर्वीच मृत झालेले असल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या तब्बल १९वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या ५२१वर पोहोचली आहे.

 The number of victims in the district is 19 | जिल्ह्यातील बळींची संख्या १९

जिल्ह्यातील बळींची संख्या १९

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी (दि. ७) आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मालेगावचे चार रुग्ण हे यापूर्वीच मृत झालेले असल्याने जिल्ह्यातील बळींची संख्या तब्बल १९वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या ५२१वर पोहोचली आहे.
नाशकात आणि विशेषत: जिल्ह्यातील मालेगाव येथे कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रातील आणखी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे गुरुवारी (दि. ७) स्पष्ट झाले. मालेगाव येथील हे बाधित गेल्या आठवड्यात दगावले असले तरी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल यंत्रणेला गुरुवारी प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकट्या मालेगावच्या कोरोना बळींची संख्या १५ इतकी झाली आहे. मालेगाव येथे गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना मालेगाव येथील वाढत्या बळींच्या संख्येमुळे धक्का बसला आहे.
केवळ मालेगावच नव्हे तर जिल्ह्याच्या अन्य ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ७) १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी तिघांचे अहवाल हे दुसरे होते. यात मालेगाव येथे चार, येवल्यात दोन, सिन्नर १,  नाशिक शहरातील ४ आणि अन्य क्षेत्रातील चौघांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १३ रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गुरुवारी दिवसभरात १४९ अहवाल प्राप्त झाले.  दरम्यान, जिल्ह्यातील येवला येथे देखील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी येवला येथील
विलगीकरण कक्षाची पाहणी केली. येथील सुविधांचा आढावा घेत त्यांनी उणिवा दूर करत अधिकाऱ्यांनी समन्वयाने
आपली जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

Web Title:  The number of victims in the district is 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक