जिल्ह्यात ३० दिवसांत बळींची संख्या १२ वरून १०२वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:25 PM2020-06-10T21:25:34+5:302020-06-11T00:59:49+5:30

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.

The number of victims in the district has increased from 12 to 102 in 30 days | जिल्ह्यात ३० दिवसांत बळींची संख्या १२ वरून १०२वर

जिल्ह्यात ३० दिवसांत बळींची संख्या १२ वरून १०२वर

Next

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.
नाशकात चौथ्या टप्प्यापासूनच लॉकडाऊन संपुष्टात आल्याप्रमाणेच नागरिकांचे व्यवहार सुरू झाल्याने रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर गत आठवड्यात लॉकडाऊन उठल्यानंतर तर जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव या दोन्ही महापालिका क्षेत्रात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे.
मृतांच्या आकड्याने जिल्ह्यात शंभरी ओलांडल्याने अधिकच घबराट निर्माण झाली आहे. सलग आठवडाभर ग्रामीणपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येण्याची नाशिकची वाटचाल मंगळवारी-देखील कायम राहिली. मंगळवारी आढळलेल्या ३२ रुग्णांपैकी तब्बल २७ रुग्ण हे नाशिक महानगरातील आहेत. शहरातील बाधित रुग्णसंख्या आढळण्याचे प्रमाण आठवडाभरात अधिक पटीने वाढले आहे.
-----------------------------
जिल्ह्यात सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काम
मे महिन्याच्या प्रारंभी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अवघी १४ होती. त्यात दोन आठवड्यात लक्षणीय सुधारणा होऊन ती १४ मे रोजी ४५९वर पोहोचली, तर ३१ मेपर्यंत ८२६ आणि गत दहा दिवसात तर १०९३वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात अधिक असण्याचे कारण जिल्ह्यातील सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काम आहे. कोरोनाबाधित रुग्ण प्राथमिक अवस्थेत शोधून काढल्याने त्यांच्यापासून इतरांना होणारी बाधा टळते तसेच हे रुग्ण बरे होण्याची शक्यतादेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते.
-----------------------
महानगरात नियमांचा भंग
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थ सर्व नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.
------------------------
मृत्युदरातील वाढ धोक्याची घंटा
नाशिक जिल्ह्यात १ मेपर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन आठवड्यात २१ने वाढ होऊन १४ मेदरम्यान मृतांचा आकडा ३३वर पोहोचला होता. त्यानंतरच्या आठवडाभरात १३ जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या ४६ झाली, तर २१ मेपासून ९ जून या २० दिवसांत मृतांची संख्या ४६वरून १०२वर म्हणजेच दुपटीहून अधिक वाढली असून, हे वाढते प्रमाण नाशिकसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, महानगरातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

Web Title: The number of victims in the district has increased from 12 to 102 in 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक