परिचारिका या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत : माधुरी कांगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:22 AM2018-05-13T00:22:22+5:302018-05-13T00:22:22+5:30
दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देणाºया, प्रसंगी खंबीर भूमिका घेत रुग्णहिताच्या गोष्टी आग्रहाने करून घेणाºया परिचारिका या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत, वैद्यकीय क्षेत्राचे ते मोठे बलस्थान आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. माधुरी कांगणे यांनी केले.
नाशिक : दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या, त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देणाºया, प्रसंगी खंबीर भूमिका घेत रुग्णहिताच्या गोष्टी आग्रहाने करून घेणाºया परिचारिका या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत, वैद्यकीय क्षेत्राचे ते मोठे बलस्थान आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. माधुरी कांगणे यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महिला विभाग, भूलतज्ज्ञ विभाग यांच्या वतीने आयोजित परिचारिका दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शनिवारी (दि.१२) दुपारी शालिमारजवळील आयएमए हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. त्या पुढे म्हणाल्या की, परिचारिकांशिवाय वैद्यकीय क्षेत्र पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे आशास्थान असणाया परिचारिकांनी आपले ज्ञान वाढवत न्यावे. सर्वोच्च स्थान प्राप्त करू इच्छिणाºयाला कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसतो हे लक्षात ठेवावे. आजच्या पिढीने सोशल मीडिया, मित्रमैत्रिणींमध्ये निरर्थक वेळ घालवणे, अति टीव्ही पाहणे या गोष्टींचा मोह टाळला पाहिजे. समाजात होत असलेल्या चुकीच्या गोष्टींबाबत जागृत राहावे, पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हेल्मेटचा वापर आणि सायबर क्राइम या विषयावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर डॉ. नितीन वाघचौरे यांनी ‘बेसिक कार्डियाक अॅण्ड लाइफ सपोर्ट’ याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. रुग्णाला अचानक कार्डियाक अरेस्ट झाले तर काय करावे यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते. त्याचे सर्वसामान्य लोक, पॅरामेडिकल स्टाफ व डॉक्टर अशा तीन गटात वर्गीकरण करून प्रशिक्षण देण्याची पद्धत असून, त्या अंतर्गत परिचारिका दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातून उपस्थित परिचारिकांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. पाणी शिंपडणे, कांदा हुंगवणे आदी गोष्टींमध्ये वेळ न घालवता त्याचे हृदय चालू आहे का? ते पाहून त्याला बेसिक लाइफ सपोर्ट देत लवकरात लवकर वैद्यकीय उपचार द्यावेत, दवाखान्यात दाखल करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय, कामगार रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आदी ठिकाणच्या चांगली कामगिरी करणाºया परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आयएमएचे डॉ.आवेश पलोड, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. नितीन चिताळकर, डॉ. सरला सोहंदानी, डॉ. प्रीती बजाज, डॉ.ज्योत्स्ना पवार, डॉ. दिनेश पाटील, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. अर्चना बोधले, डॉ. राहुल भामरे, डॉ. वैशाली काळे आदी उपस्थित होते. डॉ. माधवी मुठाळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉक्टर्स, शहरातील विविध रुग्णालयांमधील परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
परिचारिका दिनाचे औचित्य साधून यावेळी उत्कृष्ट सेवा बजावणाºया परिचारिका व वैद्यकीय कर्मचाºयांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यात दिनेश खैरनार, भाग्यश्री दिवाण, दीपक जाधव, कुमुदिनी अहिरे, रंजना कापडणीस, दीपाली बढे, छाया जामखिंडीकर, योगिता मोगरे, इरा लोखंडे, निशा चव्हाण, मनीषा करवंदे, विमल भालेराव, गीता बाणे, मीनाक्षी केतकर, संगीता बाविस्कर आदींचा समावेश होता.