अंगणवाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:06 PM2020-07-30T23:06:10+5:302020-07-31T01:32:58+5:30

नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात जिल्ह्णातील अंगणवाड्या अद्यापही बंदच असल्याने अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदरमातांसाठी घरपोच पोषण आहार देण्यात येत असून, पावसाळा व कोरोनाचा विचार करता सर्व अंगणवाड्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत पोषण आहार पुरविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्याला भेट देऊन पोषण आहाराचा आढावा घेतला.

Nutrition to Anganwadis till the end of September | अंगणवाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत पोषण आहार

अंगणवाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत पोषण आहार

Next
ठळक मुद्देवाटपाचा आढावा : अश्विनी आहेर यांची इगतपुरीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात जिल्ह्णातील अंगणवाड्या अद्यापही बंदच असल्याने अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदरमातांसाठी घरपोच पोषण आहार देण्यात येत असून, पावसाळा व कोरोनाचा विचार करता सर्व अंगणवाड्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत पोषण आहार पुरविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्याला भेट देऊन पोषण आहाराचा आढावा घेतला.
सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी (संभाजीनगर), बोरटेंभे, पिंप्रीसदो, भावली येथील अंगणवाडी केंद्र तसेच पंचायत समिती इगतपुरी, एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प (आयसीडीएस) कार्यालयास भेट देऊन घोटी येथील अंगणवाडी सेविकांची बैठक घेण्यात येऊन त्यात बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्याबाबत कोरोना काळात कशाप्रकारे काळजी घेतली जाते याबाबत जाणून घेण्यात आले. सर्व बालकांना अंगणवाडी सेविका मार्फत घरपोच गरम ताजा आहार, अमृत आहार दिला असून, सर्व बालकांचे वजन घेऊन लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बालकांचे कुपोषण कमी होऊन बालमृत्यू होऊ नये, बाळाची काळजी योग्यप्रकारे घेतला जावी यासाठी स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप सभापतींच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी भागातील मुलांना राष्ट्रपती अब्दुल कलाम अमृतआहार योजनेंतर्गत पिंपी सदो येथील लाभार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आले.
इगतपुरी पंचायत समिती एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षिकांची बैठक घेऊन कामकाज आढावा घेण्यात आला. बैठकीत अमृत आहार, गरम ताजा आहार, टी.एच.आर, गृहभेटी, ग्राम बाल विकास केंद्राचा आढावा घेण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर गृह व्ही.सी.डी.सी चालू आहेत. त्यामुळे प्रत्येक कुपोषित बालकांना अंगणवाडीसेविकामार्फत बालकांना आहार देण्याच्या तसेच पोषण आहारबाबत कोणतीही तक्रार आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा सभापती आहेर यांनी दिला. याबैठकीस इगतपुरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Nutrition to Anganwadis till the end of September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.