पोषण आहार परसबाग अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:05 PM2020-07-18T22:05:54+5:302020-07-19T00:40:11+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथे नागरिकांना अन्न, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या संकल्पनेतून ‘माझी पोषण परसबाग’ अभियान राबविण्यात आले. कोविड परिस्थितीत ताजा भाजीपाल्याचा तुटवडा दूर करणे व जोखीम प्रवण व्यक्ती व कुटुंबांच्या अन्नसुरक्षेचा आणि पोषणसुरक्षेचा प्रश्न निकाली निघण्यास यामुळे मदत होणार असून, कुपोषणमुक्तीसाठी हातभार लागणार आहे.

अभियान यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा अभियान व्यवस्थापक बंडू कासार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. मोहीम यशस्वीतेसाठी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान बच्छाव, तालुका व्यवस्थापक मनीषा काशीद, संजीवनी चौधरी, प्रभाग समन्वयक भूषण शिरोडे, उपजीविका प्रकल्पचे सहायक व्यवस्थापक किशोर सावंदे, लवलेश सकट, रंजना कडाळे, पंचफुला गांगोडे, रेखा पवार, रंजना राऊत, वनिता मोरे, रत्ना पवार, प्रांजल गोसावी यांनी परिश्रम घेतले.