दोन वर्षांनंतर मिळाला पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:38 AM2018-06-28T00:38:55+5:302018-06-28T00:42:43+5:30
घोटी : आवळी दुमाला येथील फलाटवाडी या आदिवासी वस्तीत असलेल्या अंगणवाडीत गेली दोन वर्षांपासून पोषण आहार मिळत नसल्याची बाब उघड झाली होती. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पालकांनी बालकांसह पंचायत समितीत केलेल्या ठिय्या आंदोलनाला यश आले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पंचायत समितीने दखल घेत या पाड्यावर पोषण आहार वितरित करण्यास आरंभ केला आहे. श्रमजीवी संघटनेने पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर पोषण आहाराच्या मागणीसाठी बालक व पालक यांनी पंचायत समितीमध्ये ठिय्या मांडून आंदोलन केले होते.

या आंदोलनाची आणि वृत्ताची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने या पाड्यावर पोषण आहार वितरित करण्यास सुरु वात केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. श्रमजीवी संघटनाइगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला गावांतर्गत येणाऱ्या फलाटवाडी या आदिवासी पाड्यावर अंगणवाडीमधून गेल्या दोन वर्षांपासून सकस पोषण आहार दिला जात नव्हता. या गंभीर बाबीची माहिती पालकांनी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, संजय शिंदे, संतोष ठोंबरे यांना सांगितली.