निधीविना ‘पोषण माह’ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:49+5:302021-09-18T04:15:49+5:30

नाशिक : बालविकास प्रकल्प १ अतंर्गत २०५ आणि प्रकल्प २ अंतर्गत २१० अंगणवाड्याद्वारे नवजात शिशुसह मातांचे आरोग्य सदृढ ...

‘Nutrition Month’ without funds - A | निधीविना ‘पोषण माह’ - A

निधीविना ‘पोषण माह’ - A

Next

नाशिक : बालविकास प्रकल्प १ अतंर्गत २०५ आणि प्रकल्प २ अंतर्गत २१० अंगणवाड्याद्वारे नवजात शिशुसह मातांचे आरोग्य सदृढ राहावे, गरोदर मातांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि कमी वजन असलेल्या बालकांचे आरोग्य सुधारावे यासाठी ‘पोषण माह’ राबविण्यास प्रारंभ झाला आहे. यात विविध उपक्रम असले तरी त्यासाठी शासनाने कोणत्याही वेगळ्या निधीची तरतूद केलेली नाही. जनजागृती, खाण्यापिण्याविषयी मार्गदर्शन व समुपदेशन यावर भर देण्यात आल्याचे चित्र आहे.

--------------------- सिन्नरला प्रभातफेरी

सिन्नर : पोषण माहच्या पहिल्या दिवशी गावोगावी प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. सप्टेंबर महिनाभर राबविलेल्या जाणाऱ्या या पोषण माहमध्ये गरोदर महिला, नवजात शिशु व माता काळजी यावर मार्गदर्शन केले जात आहे. दररोज विविध उपक्रम गावोगावी राबविले जात असल्याचे दिसून येते. अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या माध्यमातून कोरोनाच्या काळातही विविध उपक्रम राबविले जात आहेत. बालक व गरोदर मातांची वजन पडताळणी, एच. बी. कमी असलेल्या महिलांना आहारविषयी मार्गदर्शन, आहार प्रदर्शन, वजन कमी असलेल्या समुपदेशन याच्यासह जनजागृतीवर विशेष भर दिला जात आहे. जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात दिंडोरी (उमराळे) तालुका प्रथम, तर सिन्नर तालुका द्वितीय क्रमांकावर आहे.

--------------------------------

फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे पोषण माहअंतर्गत करण्यात आलेल्या आहार प्रदर्शन कार्यक्रमाप्रसंगी सरपंच अनुराधा संजय गडाख, वैद्यकीय अधिकारी डॉ. विधाते, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या. (१६ सिन्नर पोषण)

------------------------

येवला उपजिल्हा रुग्णालयाची उपक्रमाकडे पाठ

येवला : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सदर उपक्रम अद्याप सुरू झालेला नाही. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांमार्फत मात्र नवजात शिशुसह मातांची आरोग्य तपासणी केली जाते. उपकेंद्र स्तरावर योगा अभ्यास करून घेतला जातो. याबरोबरच पोषण आहाराविषययी मार्गदर्शन ही केले जाते. तालुक्यातील मुखेड, अंदरसुल, नगरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परसबागेत औषधी झाडे लावण्यात आली आहे. इतर ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आलेला नाही.

---------------------------------

चांदवड प्रकल्पात रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती

चांदवड : येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना चांदवड एक व दोन प्रकल्पात प्रत्येक अंगणवाडी केंद्र स्तरावर एक सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या महिनाभराचे काळात पोषण आहार मास म्हणून साजरा करण्यात येत असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी यांनी दिली. यात अंगणवाडीसेविका, आशासेविका, आरोग्यसेविका या संयुक्त गृहभेटीतून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून व्यापक प्रचार व प्रसिद्धी करीत आहेत. कोविड-१९ची भयानक परिस्थितीत कुपोषण रोखण्यात यशस्वी झालो असलो तरी आहारासंबंधी प्रत्येक कुटुंबाला माहिती देणे, गरोदर माता स्तनदा माता, सहा महिने ते सहा वर्षे बालके, किशोरवयीन मुली यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात प्रशिक्षण शिबिर, भाज्याचे महत्त्व, प्रभातफेरीच्या माध्यमातून महिला मार्गदर्शन तसेच आहार प्रदर्शन करून जनजागृती ,रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती याचबरोबर परिसरात नवजात शिशुसह माताचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठी योगा अभ्यास घेतला जात आहे. (१६ चांदवड उपोषण)

----------------------------- कळवणला उपजिल्हा रुग्णालयात पोस्टर स्पर्धा

कळवण : सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. या दरम्यान ० ते १३ वर्षे वयोगटांतील मुलाच्या मातांना प्राधान्याने कोविड लस देण्यावर भर देण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार यांनी केले. कुपोषण रोखण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावत असून, याची पालक व पाल्य यांच्यात प्रबोधन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे दरवर्षी ‘पोषण माह’चे आयोजन केले जाते. ‘सही पोषण देश रोशन’ या संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्यात येत असून मानवी जीवनात पोषणाचे अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. पोषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी जरी हा महिना साजरा करण्यात येत असला, तरी कोविड लसीकरणावर भर द्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार यांनी यावेळी केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत पवार ,डॉ. लाड, डॉ. गोडबोले डॉ. धामने, डॉ. प्राजक्ता वैद्य, डाॅ. चौरे, सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. (१६ कळवण पोषण)

-------------------

Web Title: ‘Nutrition Month’ without funds - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.