पोषण आहार चवीची ‘खिचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:02 AM2018-11-06T01:02:53+5:302018-11-06T01:03:36+5:30

शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे.

 Nutritional diet | पोषण आहार चवीची ‘खिचडी’

पोषण आहार चवीची ‘खिचडी’

Next

नाशिक : शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आहारावरील नियंत्रण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे चव तपासण्यासाठीची यंत्रणा अस्तित्वात असली तरी या यंत्रणेकडून खरोखरच आहाराची तपासणी होते का? हाही मोठा प्रश्नच आहे.  शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीनुसार शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो की नाही हे तपासण्याची जबाबदारी शाळापातळीवर निश्चित असताना यातून आता मुख्याध्यापकांना वगळण्यात आल्याने पोषण आहाराचा दर्जा तपासण्याबाबत काहीशी शिथिलता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्याध्यापकांवरील कामाचा ताण पाहता त्यांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावरील भार हलका करण्यात आलेला आहे.
शालेय पोषण आहार योजना राबविताना मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची चव मुख्याध्यापकांनादेखील घ्यावी लागत होती. आहाराची प्रथमस्तरावर चव आहार तयार करणारा स्वयंपाकी, दुसºया स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, तर शेवटी तिसºया स्तरावर मुख्याध्यापक यांच्यावर चव घेण्याची जबाबदारी होती. परंतु मुख्याध्यापकांवरील अन्य कामाचा ताण पाहता खिचडीची चव घेण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अनेक वर्षांपासून याबाबत शासनदरबारी मुख्याध्यापकांचा प्रयत्न सुरू होता.  आता काही अटींमध्ये शासनाने शिथिलता आणली असून मुख्याध्यापकांना दिलासा देण्यात आला आहे. चव चाखण्यासाठी तीन स्तरावर होणारी सक्ती आता कमी करण्यात आलेली आहे. आहाराची चव आता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक किंवा योजनेशी शिक्षक यापैकी केवळ एकानेच चव घ्यावी, असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांवरील सक्ती कमी झाली आहे.
तपासणी शाळास्तरावरच अवलंबून
अस्तित्वात असलेली यंत्रणा आणि नवी यंत्रणा खरोखरच पोषण आहाराची चव घेते का? हा संशोधनाचा विषय आहे. पोषण आहाराची चव खरोखरच तपासली जाते की नाही याची तपासणी न होता केवळ ‘चव नोंद’ वहीच तपासली जाते, असे आजवरचे चित्र राहिले आहे.

Web Title:  Nutritional diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.