नाशिकमध्ये २ लाख ४८ हजाराचा नॉयलॉन मांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:15 IST2024-01-05T15:15:37+5:302024-01-05T15:15:51+5:30
नाशिक : शहरात नॉयलॉन मांजामुळे मागील तीन वर्षात तीन जणांना जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीररित्या जखमी झाले ...

नाशिकमध्ये २ लाख ४८ हजाराचा नॉयलॉन मांजा जप्त
नाशिक : शहरात नॉयलॉन मांजामुळे मागील तीन वर्षात तीन जणांना जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याशिवाय पक्षांनाही त्याची झळ बसते. त्यामुळे मकरसंक्रात जवळ येताच पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. गुरूवारी (दि.४) एकाच दिवसात २ लाख ४८ हजार ८०० रूपयांचा नॉयलॉन मांजा शहरात जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वात माेठी कारवाई देवळाली कॅम्प पाेलिस स्टेशन हद्दीत करण्यात आली. प्रितेश साेनवणे (१९) यास अटक करण्यात येऊन विक्रीच्या उद्देशाने जवळ ठेवलेला तब्बल दोन लाख आठ हजार रूपये किमतीचा जीवघेणा नॉयलॉन मांजा त्याचेकडून जप्त करण्यात आाला. शहरातील अंबड, म्हसरूळ येथेही कारवाई करण्यात आली.