नायलॉन मांजामुळे ओढावते ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:14 IST2018-12-24T00:13:46+5:302018-12-24T00:14:39+5:30

नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीची हौस भागविण्यास सुरुवात झाल्याचे आकाशात दिसणाऱ्या पतंगवरून लक्षात येते. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह मानवावरही दरवर्षी ‘संक्रांत’ ओढावते. नायलॉन मांजाने मानेला, चेहºयाला गंभीर दुखापत होऊन जायबंदी होण्याच्या घटना शहर व परिसरात घडतात. यामुळे नायलॉन मांजाच्या वापर-विक्रीवर कायदेशीर बंदी जाहीर करण्यात आली आहे.

Nylon scratches out of 'Sanctified' | नायलॉन मांजामुळे ओढावते ‘संक्रांत’

नायलॉन मांजामुळे ओढावते ‘संक्रांत’

लोकमत विशेष

नाशिक : नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीची हौस भागविण्यास सुरुवात झाल्याचे आकाशात दिसणाऱ्या पतंगवरून लक्षात येते. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह मानवावरही दरवर्षी ‘संक्रांत’ ओढावते. नायलॉन मांजाने मानेला, चेहºयाला गंभीर दुखापत होऊन जायबंदी होण्याच्या घटना शहर व परिसरात घडतात. यामुळे नायलॉन मांजाच्या वापर-विक्रीवर कायदेशीर बंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीदेखील पतंगबाजीसाठी सर्रासपणे नायलॉन मांजा वापरला जात असल्याने ही बंदी कागदोपत्रीच असल्याचे बोलले जात आहे.
पर्यावरण व नैसर्गिक जैवविविधतेच्या संवर्धन व संरक्षणासाठी वनविभागासह महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या ठोस पावले उचलून नायलॉन मांजा वापर व विक्रीविरोधात धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. आगामी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचे वेध बाजारपेठेसह तरुणाईला लागले आहेत. आकाशात पतंग भिरभिरताना दिसत आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये नायलॉन मांजाचे रीळ चोरी-छुप्या मार्गाने अगदी सहज उपलब्ध होत आहेत. आपला पतंग समोरच्या स्पर्धक पतंगपुढे टिकून रहावा यासाठी नायलॉन मांजाच्या वापराला तरुणाई पसंती देते.  मात्र अवघ्या दोन ते दहा रुपयांच्या पतंगमुळे मुक्या जिवांचा जीव धोक्यात येतो तर मानवालाही दुखापतीचा सामना  करावा लागतो. याबाबत सातत्याने जनप्रबोधनही केले जाते;  मात्र नायलॉन मांजाचा वापर थांबता थांबत नसल्याचे चित्र  आहे.
नायलॉन मांजाचा सापळा वर्षानुवर्षे ‘जैसे थे’
वाºयाचा दाब आणि घर्षणामुळे नायलॉन मांजादेखील तुटतो आणि वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावतो. यामुळे अनेक दुचाकीस्वार, पादचाºयांच्या मानेला दुखापत होण्याच्या घटना सातत्याने डिसेंबर ते जानेवारीअखेरपर्यंत घडतात. तसेच बहुतांश पक्ष्यांंवरही या मांजाच्यारूपाने ‘संक्रांत’ ओढावते. झाडांवर नायलॉन मांजाचे जाळे वर्षानुवर्षे तसेच राहते. हा मांजा वातावरणात दीर्घकाळ ‘जैसे थे’ राहत असल्याने पक्ष्यांच्या पंखांना तसेच पायांना मांजाचा पीळ बसून पक्षी मृत्युमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडतात.
गिधाडही पडले मृत्युमुखी
गेल्या वर्षी मकरसंक्रांतीला सातपूर भागात संध्याकाळी नायलॉन मांजाने पंख कापले गेल्याने एक गिधाड घरावर आदळून मृत्युमुखी पडले. पक्ष्यांमध्ये सर्वांत मोठा व शक्तिशाली म्हणून गिधाड पक्षी ओळखला जातो. या मृत्युमुखी पडलेल्या गिधाडाचे वजन साधारणत: साडेचार किलो होते तर वय दोन ते अडीच वर्षे इतके होते. नायलॉन मांजामुळे गिधाडसारखा शक्तिशाली पक्षी मृत्युमुखी पडत असेल तर अन्य लहान पक्ष्यांची काय अवस्था होत असेल त्याची कल्पना न केलेली बरी.

 

 

 

 

 

 

Web Title: Nylon scratches out of 'Sanctified'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक