ओशिया मातेची महाआरती, जागरण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:05 AM2018-03-20T01:05:33+5:302018-03-20T01:05:33+5:30

अखिल भारतातील ५२ शक्तिपीठापैकी एक असलेली राजस्थानमधील अनेक कुळाची कुलस्वामिनी मूळमाता श्री सच्चियाय (ओशिया) मातेच्या महाआरतीने सोमवारी (दि. १९) रात्री उशिरा जागरण सोहळ्यास सुरुवात झाली. श्री सच्चियाय (ओशिया) माता सेविक संघ नाशिकतर्फे यावर्षीही प्रथमच चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला सज्योत महाआरती व भव्य जम्मा जागरण करीत ओशिया मातेचा जयघोष केला.

Oasya mother's Mahatati, Jagaran Sobhala with excitement | ओशिया मातेची महाआरती, जागरण सोहळा उत्साहात

ओशिया मातेची महाआरती, जागरण सोहळा उत्साहात

googlenewsNext

नाशिक : अखिल भारतातील ५२ शक्तिपीठापैकी एक असलेली राजस्थानमधील अनेक कुळाची कुलस्वामिनी मूळमाता श्री सच्चियाय (ओशिया) मातेच्या महाआरतीने सोमवारी (दि. १९) रात्री उशिरा जागरण सोहळ्यास सुरुवात झाली. श्री सच्चियाय (ओशिया) माता सेविक संघ नाशिकतर्फे यावर्षीही प्रथमच चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला सज्योत महाआरती व भव्य जम्मा जागरण करीत ओशिया मातेचा जयघोष केला. राजस्थानी समाज उद्योग धंद्यामुळे जगभर पसरला असून, अनेकजण आपल्या कुलाचारासाठी राजस्थानमध्ये जाऊन ओशिया मातेच्या चरणी नतमस्तक होतात. परंतु काही भक्तांना मूळस्थानी शक्य होत नसल्याने त्यांनी मखमलाबादरोड परिसिरातील श्रद्धा लॉन्स येथे आपल्या कुलस्वीमिनीच्या कुलाचारासाठी ओशिया मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाआरती व जागरण केले. ओशिया मातेची सज्योत पारिवारिक महाआरती ही आगळीवेगळी संकल्पना असून, आरतीसाठी सामान्यातला सामान्य परिवारालाही आरतीचा मान मिळत असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात या जागरण सोहळ्यास उपस्थिती नोंदवली. याप्रसंगी कोलकाता येथील भजन सम्राट राहुल ग्रेवाल व सहकारी यांनी भजन व नृत्य नाटिका सादर करीत ओशिया मातेच्या जागरणात संगीत सेवा सादर केली. यावेळी उत्सव समितीचे सतीश बोरा, बद्रीनारायण सारडा, महेश कलंत्री, किरण बद्दर, दीपक चोपडा, विजय बाफना, मुकुंद राठी, राजेंद्र कुमट, धीरज मालू, राजेश धूत आदी उपस्थित होते.
विविध भजने सादर
यावेळी ‘मैया तु नवरात्री मै धरतीपर आती हो’, ‘मैय्या का चोला लाल लाल हो गया’ आदी भजने सादर करण्यात आली. आपल्या रहिवासाच्या ठिकाणीच एकत्र येऊन ओशिया मातेची महाआरती व जागरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. नाशिकमधील ओसिया मातेच्या भक्त-परिवाराने या जाहरण सोहळ्यात उत्साहात सहभागी होत महाआरती केली.

Web Title: Oasya mother's Mahatati, Jagaran Sobhala with excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक