येवला तालुक्यात कार्यालयांमध्ये व्यसनमुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:40 PM2020-08-16T22:40:38+5:302020-08-17T00:24:29+5:30
येवला : शहर व तालुका परिसरातील विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. या निमित्ताने शासकीय कार्यालयांमधून व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहर व तालुका परिसरातील विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. या निमित्ताने शासकीय कार्यालयांमधून व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.
शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्र म तहसील कार्यालयात झाला. प्रांताधिकारी सोपान कासार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तहसीलदार रोहिदास वारूळे उपस्थित होते.
पंचायत समिती कार्यालयात सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्र मास गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.
येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील टिळक मैदान येथे सेवानिवृत्त सैनिक नवनाथ दाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नाशिक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, चांगदेव खैरे, रांजेद्र घोडके, दत्तात्रय चव्हाण, नंदकुमार शिंदे, मुकुंद पोफळे, राजे आबासाहेब शिंदे, भगवान रसाळ, महेश भांडगे आदी उपस्थित होते.
येवला नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपनगराध्यक्ष सूरज पटणी, मुख्याधिकारी संगीता नांदूकर, उपमुख्याधिकारी पाटील उपस्थित होते. येवला तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या हस्ते, तर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यसैनिक पाल्य प्रकाश माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्याचप्रमाणे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्षा राजश्री पहिलवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राधाकिसन सोनवणे, बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, साहेबराव मढवई, दीपक लोणारी, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, प्रवीण पहिलवान, गणेश पंडित, समीना शेख, गोटू मांजरे, सचिन कळमकर, नितीन आहेर आदी उपस्थित होते. येवला मर्चंट्स को. आॅप बँकेत चेअरमन अरुण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
संतोष माध्यमिक विद्यालय, रहाडी
जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य अरुण पैठणकर यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर पोलीसपाटील नितीन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन वसंत वाघ यांनी केले.
सरस्वती विद्यालय, सायगाव
सायगाव येथील सरस्वती विद्यालयात माजी विद्यार्थी व स्वातंत्र्यसैनिक नवनाथ देवराम उशीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बबन उशीर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत कुळधर, शिक्षक -पालक संघाचे उपाध्यक्ष वसंत खैरनार उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सी. बी. कुळधर यांनी केले. सुरेश देवरे, बी. डी. पैठणकर, अशोक शेलार आदी उपस्थित होते.