तंबाखूविरोधी दिनी व्यसनमुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:28 AM2018-06-01T01:28:18+5:302018-06-01T01:28:18+5:30
नाशिक : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र माद्वारे गुरुवारी (दि. ३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित तंबाखूविरोधी सप्ताहाचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले.
नाशिक : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र माद्वारे गुरुवारी (दि. ३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित तंबाखूविरोधी सप्ताहाचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्वांना यावेळी तंबाखू न खाण्याची व धूम्रपान न करण्याची शपथ देण्यात आली.
कार्यक्र माच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागासोबतच शहरी भागातदेखील तंबाखू खाण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. लोकांना यापासून परावृत्त करण्यासाठी शासन व रु ग्णालय आपल्या स्तरावर काम करीत आहे; परंतु जोपर्यंत नागरिक स्वत:त बदल घडवीत नाही तोपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या आजाराचा नायनाट होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी तंबाखू खाणे वा धूम्रपान करणे टाळावे.
महिलांनीदेखील मिसरी अथवा तंबाखूचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक गजाजन होले यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अधिसेविका मानिनी देशमुख, प्राचार्य राजेश इनामदार, अनंत पवार, पवन बरदापूरकर, दिनेश ढोले, सागर चोथवे, शिल्पा बांगर, केशव हांडगे आदी उपस्थित होते. कविता पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्नेहल गुंजाळ यांनी आभार मानले.