कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:58+5:302021-09-13T04:12:58+5:30
कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ पंचवटी : विडी, सिगारेट, व तंबाखूजन्य पदार्थांमुळे मानवी शरीरावर होणारे विघातक परिणाम टाळण्यासाठी नागरिक आणि मनपा ...
कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ
पंचवटी : विडी, सिगारेट, व तंबाखूजन्य पदार्थांमुळे मानवी शरीरावर होणारे विघातक परिणाम टाळण्यासाठी नागरिक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ करिता आयुक्त यांचे आदेशाने डॉ. आवेश पलोड, संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. अविनाश पलोड, नाशिक, पंचवटी विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय स्वछता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी घंटागाडी पार्किंग येथे घंटागाडी कर्मचारी सुपरवाइजर यांना घंटागाडी जीपीएस मार्गानुसार प्रभागातील ओला, सुका, घातक प्लास्टिक कचरा वर्गीकरण करून स्वीकारणे, सार्वजनिक ठिकाणचा कचरा, ब्लॅक स्पॉट भरताना झाडून स्वच्छ करून घेणे, कर्मचारीवर्गाने कामावर असताना कोविडपासून बचाव करण्यासाठी मास्क, हातमौजे, परिधान करणेबाबत सूचना दिल्या. यावेळी राज्य शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य कोटपा कायदा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामाबाबत व यापासून दूर राहणेबाबत मार्गदशन करण्यात आले. तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा सेवन सोडण्याबाबत संकल्प करून मी स्वतः व्यसन करणार नाही. दुसऱ्यांनाही व्यसनापासून मुक्ती देण्यास प्रयत्न करीन. सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता, रोगराईचा फैलाव करणार नाही, याबाबत शपथ देण्यात आली.