नाशकात विद्यार्थ्यांनी घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:52 PM2019-01-08T12:52:07+5:302019-01-08T12:53:38+5:30

शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील मानवधन शिक्षण सस्थेच्याप्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल पाथर्डी फाटा येथील विद्यार्थ्यांनी पतंग उडविताना नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली. शहरात नायलॉनम मांज्यामुळे पक्षी अडकून त्यांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यासोबतच नायलॉन मांजामुळे सायकलस्वार, दुचाकीस्वारांना गळा कापून दुखापत झाल्याने अपघाताचे प्रकारही घडले आहे. काही प्रकरणांमध्ये अपघातात जखमी होऊन अथवा गळा कापल्याने काही व्यक्तींचा मृत्यूही च्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व शाळांना अशाप्रकारे विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्यबाबत शपथ देण्याच्या सूचना केल्या आहेत.

The oath of using Nylon Manja by the students took place in Nashik | नाशकात विद्यार्थ्यांनी घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ

नाशकात विद्यार्थ्यांनी घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ

googlenewsNext
ठळक मुद्देमी नायलॉन मांडा वापरणार नाही...नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली शपथ महानगरपालिकेच्या सुचनेनुसार शाळांमध्ये उपक्रम

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील मानवधन शिक्षण सस्थेच्याप्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल पाथर्डी फाटा येथील विद्यार्थ्यांनी पतंग उडविताना नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली. शहरात नायलॉनम मांज्यामुळे पक्षी अडकून त्यांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यासोबतच नायलॉन मांजामुळे सायकलस्वार, दुचाकीस्वारांना गळा कापून दुखापत झाल्याने अपघाताचे प्रकारही घडले आहे. काही प्रकरणांमध्ये अपघातात जखमी होऊन अथवा गळा कापल्याने काही व्यक्तींचा मृत्यूही च्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व शाळांना अशाप्रकारे विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्यबाबत शपथ देण्याच्या सूचना केल्या आहेत.  
नायलॉन च्या वापरामुळे अनेक पक्षी तसेच नागरिक जखमी होतात काहींना आपला जीवही गमवावा लागतो.हे धोके टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली तसेच इतरही कोणी असे करत असतील तर त्यांनाही यापासून परावृत्त करू तसेच वाहनांची वर्दळ असेल त्याठिकाणी आम्ही पतंग उडवणार नाही अशी शपथ घेतली.  यावेळी मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे,मुख्याध्यापक वैशाली पवार आदी मान्यवर व सर्व शिक्षक,मानवसेवक  उपस्थित होते.नाशिक महानगरमालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व  शाळाना अशा प्रकारे नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी द्यावी यासाठी ५ जानेवारी रोजी लिखित पत्राद्वारे सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ दिली जात आहे. 

 

Web Title: The oath of using Nylon Manja by the students took place in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.