‘ओबीसी’ मोर्चा नियोजन बैठक
By admin | Published: September 30, 2016 01:10 AM2016-09-30T01:10:28+5:302016-09-30T01:14:18+5:30
सटाणा : परिसरातील कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी
वटार : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मूक मोर्चा नियोजनाची बैठक सटाणा येथे झाली. सर्व ‘ओबीसी’ बांधवांनी सहकुटुंब-सहपरिवाराने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
छगन भुजबळ यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात डांबून ठेवले असून कोणत्याही आरोपामध्ये तथ्य नसून फक्त ओबीसी नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र असल्याचे मत समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले. या मोर्चात सर्व ओबीसी बांधवांनी सहभागी होऊन या सरकारला आपल्या भावना समजल्या पाहिजे. जोपर्यंत साहेब सत्तेत होते तोपर्यंत आपल्या पोळ्या भाजणारे दिसत तरी होते, साहेब जेलमध्ये आहेत तर हे लोक गेले कोठे असाही सवाल या बैठकीत करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, सुनील मोरे, अनिल पाटील, शैलेश सूर्यवंशी, राष्टवादी कॉँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरनार, उपसभापती वसंत भामरे, यतीन पगार, तालुका अध्यक्ष महेंद्र भामरे, वटारचे सरपंच प्रशांत बागुल, चौंधाण्याचे सरपंच राकेश मोरे, अनिल पाटील, भारत खैरनार, पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, भारत खैरनार, काका रौंदळ आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मोना एज्युकेशन ताहाराबाद या शाळेलासुद्धा सुटी जाहीर केल्याचे अध्यक्ष दौलत गांगुर्डे यांनी सांगितले. बागलाण तालुक्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव यांनी केली. बैठकीला माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, डॉ. दौलत गांगुर्डे, सुरेश खैरनार, संजय पवार, सुनील महाजन, संजय बच्छाव, बाळासाहेब मोरे, मनोज वाघ, सुरेश मोरे, सोमदत्त मुंजवाडकर, वैभव गांगुर्डे, रामकृष्ण अहिरे उपस्थित होते. (वार्ताहर)