आरक्षणप्रश्नी सटाण्यात ओबीसींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 10:51 PM2020-12-01T22:51:07+5:302020-12-01T23:58:53+5:30

सटाणा : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करून, ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती बागलाण यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार डी.के. बहिरम यांना निवेदन देण्यात आले.

OBCs march on reservation issue | आरक्षणप्रश्नी सटाण्यात ओबीसींचा मोर्चा

सटाणा येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व बागलाण तालुका ओबीसी आरक्षण बचाव समिती यांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी भारत खैरनार, संतोष डोमे, संजय बच्छाव, जगदीश कोठावदे, सचिन राणे, जयवंत येवला आदींसह कार्यकर्ते.

googlenewsNext
ठळक मुद्देमोर्चा शहरातून तहसील कार्यालयावरील प्रांगणात नेण्यात आला.

सटाणा : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करून, ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती बागलाण यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार डी.के. बहिरम यांना निवेदन देण्यात आले.

मंगळवारी (दि.१) येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ओबीसी बचाव समिती आंदोलनाच्या वतीने घोषणा देत मोर्चास प्रारंभ करण्यात आला. माजी नगराध्यक्ष भारत खैरनार, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संतोष डोमे, तालुकाध्यक्ष संजय बच्छाव, सटाणा वाणी समाज अध्यक्ष जयवंत येवला यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा शहरातून तहसील कार्यालयावरील प्रांगणात नेण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार डी. के. बहिरम यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा, ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसी आरक्षणामुळे लहान जाती पोटजातीमधील सुमारे पाच लाखांहूून अधिक राजकीय व्यक्तींना सत्तेची पदे मिळाली, तर लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्रात लाभ मिळून पदे मिळविता आली आहेत. यामुळे ओबीसी समाजावरील अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त केली आहे.

यावेळी ओबीसी बचाव कृती समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष जगदीश कोठावदे, सचिन राणे, डॉ. विठ्ठल येवलकर यांनी आपके मनोगत व्यक्त केले.
मोर्चात विलास दंडगव्हाळ, श्रीधर कोठावदे, कैलास येवला, वैभव गांगुर्डे, दिगंबर जाधव, सुरेश बागड, यशवंत येवला, डॉ. व्ही.के. येवलकर, डॉ. दौलतराव गांगुर्डे, अनंत शेवाळे, मनोज वाघ, राजेंद्र येवला, यशवंत कात्रे, डॉ.मनीष ढोले, गणेश जाधव, राकेश मोरे, पुंजाराम मोरे, पंकज ततार, दादाजी खैरनार, अनिल सोनजे, योगेश अमृतकर, राजेंद्र खानकरी, संजय जाधव, मोहन गवळी आदींसह ओबीस प्रवर्गातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

Web Title: OBCs march on reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.