स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ :  नितीन बानगुडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:18 AM2018-04-26T00:18:34+5:302018-04-26T00:18:34+5:30

राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

 The object of planning is self rule: Nitin Bangguide Patil | स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ :  नितीन बानगुडे पाटील

स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ :  नितीन बानगुडे पाटील

googlenewsNext

देवळाली कॅम्प : राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. देवळाली कॅम्प आठवडे बाजार मैदानावर शिवसेना व श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून सुराज्य स्थापन केले.शिवरायांनी पन्नास वर्षांत एकशेदहा किल्ले बांधले मात्र कोणत्याही किल्ल्याला स्वत:चे नाव दिले नाही. नियोजन हा शिवरायांचा स्थायिभाव होता म्हणूनच त्यांनी त्यांच्या सर्वाधिक लढाया रात्रीच्या वेळी लढल्या, असे त्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, युवराज गोडसे, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, दिनकर पाळदे, चंद्रकांत गोडसे, संजय शिंदे, प्रमोद घुमरे, प्रकाश सुराणा, संजय गोडसे, प्रवीण पाळदे, भीमा अहेर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना विधानसभा संघटक हनुमंत देवकर यांनी अनाथ मुलीच्या विवाहासाठी ५० हजार रुपये मदत प्रा. बानगुडे यांच्या हस्ते देण्यात आली.
जीवनगौरवने सन्मानित
प्रा. बानगुडे पाटील यांच्या हस्ते महाराज बिरमानी, सदाशिव मोजाड, नामदेव गोडसे, बॅनर्जी वाघचौरे, रामचंद्र पाळदे, कौसल्या मुळाणे, डॉ. जगदीश कागदे, काशीनाथ पाळदे, शेखर पाटोळे, भाऊसाहेब मोजाड, हेमंत जोशी, संतोष जुंद्रे, वैष्णवी व प्रतीक्षा भालेराव, बाळासाहेब बोडके, राजेंद्र ठाकूर, गणेश करंजकर, ओंकार काळे, पवन बोरस्ते यांचा गौरव करण्यात आला.

Web Title:  The object of planning is self rule: Nitin Bangguide Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.