जिल्ह्यात ६.३३ लक्ष हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:15 PM2020-05-11T23:15:44+5:302020-05-11T23:24:39+5:30
नाशिक : जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५.७६ लक्ष हेक्टर क्षेत्र असून, यावर्षी जिल्ह्याच्या कृषी विभागाने ६.३३ लक्ष हेक्टरवर (११० टक्के ) खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विभागाने खरीप हंगामाची तयारी केली असून, उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नाशिक : जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५.७६ लक्ष हेक्टर क्षेत्र असून, यावर्षी जिल्ह्याच्या कृषी विभागाने ६.३३ लक्ष हेक्टरवर (११० टक्के ) खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विभागाने खरीप हंगामाची तयारी केली असून, उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातही खरीप हंगामची जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा कृषी विभागानेही खरिपाचे नियोजन पूर्ण केले असून, त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे . जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५.६३ लक्ष हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. गतवर्षी उसाचे क्षेत्र वगळता एकूण ६.३७ लक्ष हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यावर्षी ६.३३ लक्ष हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यावर्षी तृणधान्यची ४.४७ लक्ष हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यातून ११४०५.७० लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून कडधान्य पेरणीस पसंती दिल्याने कडधान्याच्या उत्पादनात काहीअंशी वाढ झाली आहे. यावर्षीही ०.३३ लक्ष हेक्टरवर कडधान्य पेरणी प्रस्तावित असून, त्यापासून १.३३ लाख मेट्रिक टन कडधान्य उत्पादनाची अपेक्षा असून, यावर्षी तुरीला प्राधान्य देण्यात येत आहे. गळीत धान्यासाठी १.०९ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, पावसाचा अंदाज आणि सूक्ष्म सिंचन करून सोयाबीनचे हेक्टरी १७४० किलोग्राम उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे. सोयाबीनसाठी ०.७६ लाख हेक्टरचे नियोजन आहे. पूर्व भागात ०.८८ लाख हेक्टरवर भात पेरणीचे कृषी विभागाचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात कापूस हे मुख्य खरीप पीक असून, या पिकात मूग, उदीड ही कमी कालावधीची आंतरपीक घ्यावीत यासाठी कृषी विभागाकडून शेतकºयांचे प्रबोधन केले जात आहे.
------
मका पेरणीचे उद्दिष्ट
कमी पर्जन्यमान असलेल्या परिसरात बाजरी पिकाला प्राधान्य देण्यात आले असून, बाजरीसाठी १.०५ लक्ष हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र वाढले असून, यावर्षी २.२५ लाख हेक्टरवर मका पेरणीचे उद्दिष्ट आहे. लष्करी आळीच्या नियोजनासाठीही प्रयत्न होत आहेत. खरीप हंगामात शेतकºयांना विविध प्रशिक्षण दिले जात असून, महिला शेती शाळा घेण्यात येत आहे.