मालेगाव तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:59 PM2020-09-14T22:59:34+5:302020-09-15T01:28:00+5:30

मालेगाव:- तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक?्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे येथील कृषी विभागाने ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी चे उद्दिष्ट ठेवले आहे तर १३हजार ८०० मेट्रीक टन संयुक्त खाते तसेच ३० हजार २८० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे

Objectives of rabi crops on 42 thousand hectare area in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्टे

मालेगाव तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे उद्दिष्टे

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली जाणार

मालेगाव:- तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक?्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे येथील कृषी विभागाने ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी चे उद्दिष्ट ठेवले आहे तर १३हजार ८०० मेट्रीक टन संयुक्त खाते तसेच ३० हजार २८० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे यंदा दमदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके चांगले आले आहेत परतीच्या पावसामुळे तालुक्यातील काही ठिकाणी खरीप हंगामात पिकांची नासाडी झाली आहे असे असले तरी रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी पेरणीपूर्व मशागत मशागती शेतकरी व्यस्त झाले आहेत बी-बियाणे रासायनिक खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे खरीप हंगामातील घटलेले उत्पादनाची कसर भरून काढण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत तर येथील कृषी विभागानेही रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे तालुक्यातील ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली जाणार आहे यात पीकनिहाय हेक्टरमध्ये मध्ये क्षेत्र असे :- ज्वारी १६९ गहू ७ हजार ४८२ मका १ हजार २४४ हरभरा चार हजार २७४ ऊस ७२ भाजीपाला १४ हजार १०३ फळपीक १४ हजार९१४ फुल पिके २ तर तर रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक व संयुक्त खतांची मागणी असते खरीप हंगामात खत टंचाई जाणवली होती ही टंचाई दूर करण्यासाठी कृषी विभागाने आधीच रब्बी हंगामासाठी लागणा?्या खतांच्या आवतन नोंदवले आहे यात खते व मेट्रिक टन मध्ये नोंदविलेले असे युरिया १० हजार ५००, डीएपी २ हजार ३५८ ते एओपी ५८७ एसएसपी २हजार ७०३ अमोनियम सल्फेट ३३४, १०:२६:२६- ५ हजार ६०,१२:३२:१६-१हजार ३८०,१४:३२:२४-४६,१५:१५:१५-३ हजार २२०,१६:१६:१६-२८८,२०:२०:२०-१हजार १५०,०२४:००- २हजार५८८,१७:१७१७- ६९ मेट्रिक टन नोंदवले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली

 

Web Title: Objectives of rabi crops on 42 thousand hectare area in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.