लष्करी अळीची कृषी तज्ज्ञांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:49 PM2019-07-30T18:49:04+5:302019-07-30T18:49:22+5:30
मका पिकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या तज्ज्ञांनी पंचाळे येथे भेट देऊन प्रात्योगिक तत्त्वावर दोन शेतकऱ्यांच्या मका पिकाची पाहणी केली.
सिन्नर : मका पिकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या तज्ज्ञांनी पंचाळे येथे भेट देऊन प्रात्योगिक तत्त्वावर दोन शेतकऱ्यांच्या मका पिकाची पाहणी केली.
केंद्रीय कृषी मंत्रालय संलग्न कृषी सहकारिता व वनस्पती संरक्षण विभागाच्या वतीने नाशिक येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या वतीने मारुती बेलोटे व नवनाथ थोरात यांच्या मका पिकाची कृषी तज्ज्ञांनी पाहणी केली. या सर्वेक्षणात कीड व्यवस्थापन अधिकारी जवाहन सिंग, वैज्ञानिक अधिकारी नीता इनामदार, संदीप साळवे यांचे पथक सहभागी झाले होते. मका पिकावर यावर्षी लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली. तज्ज्ञांच्या पथकाने लष्करी अळीचा जीवनक्रम सांगून शेतामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच या अळीच्या बंदोबस्तासाठी मेट्रो जीएम आणि सीपी निमोनिया, आय बॅसिलस एनसी, निंबोळी अर्काच्या वापराबद्दल माहिती दिली.
तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, वीवीचे मंडळ कृषी अधिकारी एस. पी. पाटील, कृषी सहायक जी. डी. काकड, खरेदी-विक्री संघाचे संचालक छबू थोरात, शिवाजी आसळक आदींसह शेतकरी उपस्थित होते. देवपूर, पंचाळे, पिंपळगाव या गावांमध्ये पथकाने मका पिकाची पाहणी केली.