निरीक्षणाला अभ्यासाची जोड आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:31 AM2017-09-17T00:31:31+5:302017-09-17T00:31:54+5:30
मराठी भाषा समृद्ध असून, ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व विषय अभ्यासले पाहिजेत. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पाहणे, भरपूर वाचन करणे महत्त्वाचे आहे. मुलांनी विविध गोष्टींची निरीक्षणे करून त्याला अभ्यासाची जोड दिली तर त्यातून समाजहित साधले जाते, असे प्रतिपादन बालसाहित्यकार वीणा गवाणकर यांनी केले.
नाशिकरोड : मराठी भाषा समृद्ध असून, ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व विषय अभ्यासले पाहिजेत. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पाहणे, भरपूर वाचन करणे महत्त्वाचे आहे. मुलांनी विविध गोष्टींची निरीक्षणे करून त्याला अभ्यासाची जोड दिली तर त्यातून समाजहित साधले जाते, असे प्रतिपादन बालसाहित्यकार वीणा गवाणकर यांनी केले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल धामणकर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी गवाणकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अॅड. नागनाथ गोरवाडकर, श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, संमेलन प्रमुख शोभना भिडे, सचिव प्रसाद कुलकर्णी, कार्यक्रम प्रमुख अपर्णा क्षेमकल्याणी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात महेश दाबक यांनी भविष्यात युवकांपुढे मोठी आव्हाने असल्याचे सांगितले. उद्घाटनानंतर झालेल्या काव्य संमेलनात १३ बालकवींनी कविता सादर केल्या.