दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:46+5:302021-04-02T04:14:46+5:30

जुन्या वाहनांनी अडवले रस्ते नाशिक : द्वारका ते जुना आडगाव नाका परिसरात जुन्या वाहनांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने ...

Obstacle due to vegetable vendors on Dindori Road | दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांमुळे अडथळा

दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांमुळे अडथळा

Next

जुन्या वाहनांनी अडवले रस्ते

नाशिक : द्वारका ते जुना आडगाव नाका परिसरात जुन्या वाहनांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात जुनाट वाहने उभी असतात. या वाहनांनी रस्ता व्यापला जात असल्याने परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची अडचण होत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

मोकाट श्वानांकडील दुर्लक्षामुळे नाराजी

नाशिक : शहरातील सारडा सर्कल, गंजमाळ परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्री हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काहीवेळा वाहनांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडून काहीवेळा दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडले असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मास्क विक्रीत पुन्हा वाढ

नाशिक : कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर मास्क आणि सॅनिटायजर विक्रीच्या प्रमाणात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता कायम राहात असल्याने एकमेव पर्याय म्हणून मास्कच वापरावा लागणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे मेडिकल तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांकडील मास्कचा खप दुपटीहून अधिक वाढला आहे.

उन्हाच्या झळांनी नागरिक परेशान

नाशिक : एप्रिल महिन्याच्या प्रारंभालाच मे महिन्यासारख्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे सामान्य घरातील नागरिकांना उन्हाच्या झळांनी त्रस्त केले आहे. दुपारी लागणाऱ्या झळांबरोबरच सायंकाळीदेखील गरम वारे वहात असल्याने आपण नक्की नाशिकमध्येच आहोत का, असा विचारही मनात येऊ लागला आहे.

Web Title: Obstacle due to vegetable vendors on Dindori Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.