बाधित संख्या दीडशेनजीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 01:42 AM2021-08-13T01:42:08+5:302021-08-13T01:44:09+5:30

जिल्ह्यात बाधित रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी भर पडण्यास प्रारंभ झाला आहे. गत महिनाभरापासून सातत्याने शंभरच्या आसपास राहणारी कोरोनाबाधित संख्या गुरुवारी (दि. १२) एकूण १४४वर पोहोचली असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १०४वर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या दोन मृत्यूमुळे एकूण बळींची संख्या ८५४३ वर पोहोचली आहे.

Obstacle number near Deedshen | बाधित संख्या दीडशेनजीक

बाधित संख्या दीडशेनजीक

Next

नाशिक : जिल्ह्यात बाधित रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी भर पडण्यास प्रारंभ झाला आहे. गत महिनाभरापासून सातत्याने शंभरच्या आसपास राहणारी कोरोनाबाधित संख्या गुरुवारी (दि. १२) एकूण १४४वर पोहोचली असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १०४वर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या दोन मृत्यूमुळे एकूण बळींची संख्या ८५४३ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात एकूण उपचारार्थी संख्या ११२४ वर पोहोचली असून, कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.६१ आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालांची संख्या ८७६ झाली आहे. प्रलंबित अहवालांमध्ये सर्वाधिक ५६७ नाशिक ग्रामीणचे, नाशिक शहराचे १३८, तर मालेगाव मनपाचे १७१ रुग्ण आहेत. कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात नाशिक मनपा ९८ टक्के ओलांडत ९८.०१ वर पोहोचली आहे, तर नाशिक ग्रामीणला ९७ , मालेगाव मनपात ९६.८५, तर जिल्हाबाह्यला ९७.४३ असे कोरोनामुक्तीचे प्रमाण आहे. मृतांमध्ये नाशिक मनपा आणि ग्रामीणच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

Web Title: Obstacle number near Deedshen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.