रेशन दुकानदारांकडून अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 09:25 PM2020-04-30T21:25:30+5:302020-04-30T23:23:49+5:30
सिडको : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असून, सर्वसामान्य नागरिकांना धीर म्हणून शासनाच्या वतीने मोफत धान्य वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत.
सिडको : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असून, सर्वसामान्य नागरिकांना धीर म्हणून शासनाच्या वतीने मोफत धान्य वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु असे असतानाही स्वस्त धान्य दुकानदार मात्र नागरिकांची अडवणूक करीत असून, नागरिकांना त्यांच्या वाट्याचे पूर्ण धान्य न देता दुकानदार हे रेशनच्या धान्याचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी केला आहे. यासंदर्भात सिडकोतील चार धान्य दुकानदारांची तक्र ार त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र व केंद्र शासनाने अल्प उत्पन्न गटासाठी धान्य पुरवठा मंजूर केलेला आहे. पण सिडको परिसरात रेशनकार्डवर धान्य पुरवठा करण्यात अनियमितता दिसून येत आहे.