बाधित १५२; कोरोनामुक्त २५७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 01:38 AM2021-07-17T01:38:04+5:302021-07-17T01:39:18+5:30
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. १६) एकूण १५२ रुग्ण बाधित आढळले असून २५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,४५८ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. १६) एकूण १५२ रुग्ण बाधित आढळले असून २५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,४५८ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत १,५४८ पर्यंत घट आली असली तरी प्रलंबित अहवालांची संख्या १,४०७ पर्यंत पोहोचली आहे. प्रलंबित अहवालांमध्ये सर्वाधिक ८८० रुग्ण नाशिक ग्रामीणचे तर मालेगाव मनपाचे ३१४ असून, नाशिक मनपा क्षेत्रातील रुग्णांची संख्या २१३ आहे. नवीन बाधितांची संख्या कमी येत असतानाही प्रलंबित अहवालांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९७.४८ टक्केवर पोहोचले आहे.