पोस्ट कार्यालयात नागरिकांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:16 AM2021-09-18T04:16:03+5:302021-09-18T04:16:03+5:30

गणेशवाडी येथील टपाल कार्यालयात दैनंदिन शेकडो खातेदार टपाल संबंधित कामासाठी येत असतात. त्यात पेन्शनधारक तसेच आरडी संबंधित कामासाठी येणाऱ्या ...

Obstruction of citizens at the post office | पोस्ट कार्यालयात नागरिकांची अडवणूक

पोस्ट कार्यालयात नागरिकांची अडवणूक

Next

गणेशवाडी येथील टपाल कार्यालयात दैनंदिन शेकडो खातेदार टपाल संबंधित कामासाठी येत असतात. त्यात पेन्शनधारक तसेच आरडी संबंधित कामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या असते. कार्यालयात आल्यावर किमान ३० ते ४० नागरिक विविध कामांसाठी रांगेत उभे असतात. त्यात पैसे काढण्यासाठी व पैसे भरण्यासाठी कधी कशी एकाच रांगेत उभे राहावे लागते. केवळ पासबुक प्रिंट करण्यासाठी तर अनेक नागरिकांना तासभर रांगेत उभे राहावे लागते. याबाबत संबंधित अधिकारीवर्गाला विचारणा केली तर आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, असे सांगतात. सदर कार्यालयात पोस्ट मास्तर महिला अधिकारी असून, त्यांना विचारणा केली तर तर पासबुक प्रिंट करण्यासाठी रांगेतच उभे राहावे लागेल असे सांगतात. पंचवटी टपाल कार्यालयातील या सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टपाल कार्यालयात तीन कक्ष असून, आमच्याकडे पासबुक प्रिंट खराब होईल तुम्ही त्या काउंटरवर करा आज गर्दी आहे उद्या या असे सांगून पिळवणूक केली जाते तर रांगेत उभे राहिल्यावर दुपारी जेवणाची सुट्टी झाली म्हणून थोडावेळ थांबा असे म्हणत अडवणूक केली जात असल्याची तक्रार आहे. सदर कार्यालयात चालणाऱ्या कासवगतीच्या कामकाजाबाबत मुख्य कार्यालयाने लक्ष केंद्रित करून दखल घेणे गरजेचे आहे.

Web Title: Obstruction of citizens at the post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.