गिरणा धरणावरील ठेकेदाराकडून मच्छीमार व्यावसायिकांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:44+5:302021-03-31T04:14:44+5:30
रोंझाणे सिताणेतील ग्रामस्थ मच्छीमारीचा व्यवसाय करतात; परंतु गिरणा धरणाचा ठेकेदार अन्वर शेख हा मच्छीमारीचा ...
रोंझाणे सिताणेतील ग्रामस्थ मच्छीमारीचा व्यवसाय करतात; परंतु गिरणा धरणाचा ठेकेदार अन्वर शेख हा मच्छीमारीचा रितसर परवाना घेऊनदेखील व्यावसायिकांची अडवणूक करतो. वारंवार पोलिसांकडे तक्रार करून मासे चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतो. मच्छीमार व्यावसायिकांची मोठी पिळवणूक होत असून, पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. फक्त ठेकेदाराची बाजू घेऊन गुन्हे दाखल केले जातात; मात्र ठेकेदाराच्या मनमानीविरोधात कोणतीच कारवाई केली जात नाही. ठेकेदारावर कारवाई करावी. यावेळी भोई समाजाचे युवा अध्यक्ष विकास खेडकर व प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर पगार, समाधान मोरे, नकुष खेडकर, देवाजी खेडकर, भाऊराव जावरे, समाधान खेडकर, सोमा मोरे, मोतीराम वायडे, जिभाऊ खेडकर, पिंटू खेडकर, विक्रम जावरे, पांडुरंग जावरे, भगा मोरे, ज्ञानेश्वर खेडकर, लखन खेडकर आदी उपस्थित होते.