‘ड्रॉप अॅण्ड गो’ जागेतच वाहने उभी केल्याने अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:31 PM2019-11-13T23:31:59+5:302019-11-14T00:02:26+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील ‘ड्रॉप अॅण्ड गो’ पार्किंगच्या जागेत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील ‘ड्रॉप अॅण्ड गो’ पार्किंगच्या जागेत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर ड्रॉप अॅण्ड गो पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र त्या ठिकाणी रेल्वे प्रवासी अथवा त्यांचे नातेवाईक चारचाकी वाहने उभी करून रेल्वेस्थानकात जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. दुपारनंतर येणाऱ्या-जाणाºया रेल्वेंची संख्या जास्त प्रमाणात असल्याने प्रवाशांचीदेखील वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ड्रॉप अॅण्ड गो पार्किंगच्या जागेत १० ते १२ चारचाकी वाहने उभी राहण्याची जागा आहे. त्यामुळे त्यानंतर येणारी वाहने अडकून पडत असल्याने कोंडी होते. ड्रॉप अॅण्ड गो पार्किंगमध्ये काही वाहनधारक आपल्या चारचाकी वेड्यावाकड्या उभ्या करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा ठरतो. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून गर्दीच्या वेळेत रेल्वे प्रवेशद्वाराच्या बाहेर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कर्मचारी नियुक्त केला जात नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.