एड्स निर्मूलन दिनानिमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:40 AM2020-12-04T04:40:38+5:302020-12-04T04:40:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क. देवगाव : येथील गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना ...

On the occasion of AIDS Eradication Day | एड्स निर्मूलन दिनानिमित्त

एड्स निर्मूलन दिनानिमित्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क.

देवगाव : येथील गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली.

यावेळी एड्स आजाराविषयी महाविद्यालयातील तरुणांना विविध पैलूंची माहिती करून दिली. तसेच एड्ससारख्या आजारापासून भारतासारख्या देशामध्ये एड्स आजाराला पायबंद घालण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. यशवंत शिद यांनी सांगितले, तर सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने आपले स्टेट्स जाणून घेण्याची गरज आहे, असे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलग यांनी सांगितले. प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवर्तन काशीद यांनी, तर सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. दिलीप भोये यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, प्रा. रघुनाथ मोरे, प्रा. नवनाथ शिंगवे, मेघा काशीद आदी उपस्थित होते.

(फोटो ०३ देवगाव १)

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलग.

===Photopath===

031220\03nsk_18_03122020_13.jpg

===Caption===

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलग.

Web Title: On the occasion of AIDS Eradication Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.