शिवजयंती निमित्ताने पंचवटी परिसर भगवामय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:25 AM2021-02-18T04:25:22+5:302021-02-18T04:25:22+5:30
पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे पंचवटी कारंजा येथे ६५ फूट प्रतीकात्मक किल्ला उभारणी काम सुरू करण्यात आले आहे. राज्याचे कृषी मंत्री ...
पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे पंचवटी कारंजा येथे ६५ फूट प्रतीकात्मक किल्ला उभारणी काम सुरू करण्यात आले आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी भेट देत पाहणी करत कोरोना नायनाट झाला नसल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन भुसे यांनी केले. येत्या शुक्रवारी शिवजयंती उत्सव असल्याने त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. याप्रसंगी पंचवटी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष मामासाहेब राजवाडे, उपाध्यक्ष दिगंबर मोगरे, सतनाम राजपूत, कार्याध्यक्ष उल्हास धनवटे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंचवटी कारंजा, पेठरोड, मालेगाव स्टॅण्ड, पेठरोड, फुले नगर, नांदूर, मानूर, मेरी, म्हसरुळ, आडगाव, मखमलाबाद परिसरात शिवजयंती तयारी सुरू असून, यंदा शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग्जबाजीवर भर दिसत आहे. पंचवटीतील बहुतांश चौक होर्डिंग्जने भरून गेले असल्याने होर्डिंग्जवर झळकणाऱ्या छबीवरून वर्षभराने येणाऱ्या महापालिका निवडणुक तयारीसाठी इच्छुकांचे चेहरे दिसू लागले आहे.
इन्फो===
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली. पंचवटी शिवजन्मोत्सव समिती नियमांचे पालन करून सोहळा साजरा करणार आहे. मिरवणूक रद्द करून रक्तदान शिबिर आयोजन केल्याने तमाम शिवप्रेमींनी नियमांचे पालन करून शिवजन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे.
-मामासाहेब राजवाडे, अध्यक्ष, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती.