मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 05:49 PM2019-07-20T17:49:41+5:302019-07-20T17:49:53+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे कृषी विभागाकडून मोरेवाडी येथे शेतकरयांना चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येऊन शेतकरयांना मार्गदर्शन करण्यात आले.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे कृषी विभागाकडून मोरेवाडी येथे शेतकरयांना चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येऊन शेतकरयांना मार्गदर्शन करण्यात आले. मका पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून गावपातळीवर शेतकर्यामघ्ये चर्चा करून या आळीचा विषय शेतकरयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.खामखेडा कृषी साहयक गडाख यांनी शेतकरयांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मका पीक लागवडी नंतर पीक जमिनीबाहेर येण्यार्या कों व पोगाच्या निर्मितीपासून हि लष्करी आळी आपले बस्तान बसवीत. तेव्हा शेत स्वच्छ व तणमुक्त ठेवावे, मका पिकावर गुळाच्या पाण्याची फवारणी करावे, शेतात पक्षी थांबे उभारावे.पिकावर फवारणी सकाळी दहा वाजेच्या आत व सायंकाळी पाच वाजेनंतर फवारणी करावे .कामगधं सापके वापरावे.शेतकरयांना सापका प्रात्यिक्षक करून दाखिवले , ५ टक्के निबोळी अर्कची फवारणी करणे, इमामेकटीन बेंझाल्ट ५ पावडर ४ ग्राम १० लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी. यावेळी शेतकरयांना पंतप्रधान पीक विमा योजने विषय माहिती दिली व शेतकरयांनी २४ जुलै पर्यत पीक विमा उतरून घ्यावे .असे सांगितले.