‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:11 AM2018-10-07T01:11:41+5:302018-10-07T01:28:49+5:30
सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत.
सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत.
तालुक्यात सध्या विचित्र वातावरण निर्माण झाले असून, पहाटे हलकासा गारवा, दिवसभर कडक ऊन व रात्रीच्या वेळी उकाडा निर्माण होत आहे. त्यामुळे या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता; परंतु पावसाळ्याचे चार महिने संपले तरीही तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे.
मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी केली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरासह तालुक्यात तपमान वाढले आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा पारा वाढत असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडक ऊन पडत आहे. या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाऊस गायब होऊन त्याची जागा कडक उन्हाने घेतली आहे.
हस्त नक्षत्रात सर्वसाधारणपणे ऊन असतेच; परंतु यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन तापू लागले आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. दैनंदिन जनजीवनावर उन्हाचा परिणाम झाला असून, दुपारच्या वेळी ग्रामीण व शहरी भागातील रस्ते सुमसान होत आहेत. शेतकºयांना सध्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसाऐवजी उन्हाची तीव्रताच वाढत चालण्याने शेतकºयांच्या चिंता वाढत चालल्या आहेत.पावसाने यावर्षी शेतकºयांची प्रचंड निराशा केली असून, हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. एकही मोठा पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, पाझर तलाव कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्याने शेतीची कामे ठप्प आहेत. शेतातील पिके करपल्याने मजुरांनाही रोजगार मिळत नाही.