महामार्ग दुरुस्तीसाठी १५ ऑक्टोबरचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:09+5:302021-09-22T04:18:09+5:30

मंगळवारी (दि. २१) छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते गोंदे आणि वडपे ते ...

October 15 ultimatum for highway repairs | महामार्ग दुरुस्तीसाठी १५ ऑक्टोबरचा अल्टिमेटम

महामार्ग दुरुस्तीसाठी १५ ऑक्टोबरचा अल्टिमेटम

Next

मंगळवारी (दि. २१) छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना, भुजबळ यांनी, टोलनाक्यांची कामे करताना सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. पावसामुळे देखील या रस्त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तत्काळ गती द्यावी. जर १५ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती झाली नाही तर संबंधितांवर कारवाई करू, असा दम देऊन टोलनाक्याच्या अंतर्गत येणाऱ्या रोडची दुरुस्ती झाली नाही तर टोलनाक्यावर देखील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनीही चर्चेत भाग घेताना, मुलुंड टोलनाक्यापासून वाहतूक कोंडी होत आहे. या कार्यक्षेत्रातील रस्ते विकास यंत्रणांनी याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करावी. जेणेकरून नागरिकांचा जो रोष आहे तो लक्षात येईल. वारंवार खराब होणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. आगामी दहा वर्षांत होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे नियोजन देखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आतापासून करावे, जेणेकरून या परिसरातून होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन सुयोग्यरीत्या करता येईल, असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सचिव अन्शुमली श्रीवास्तव यांनी, वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझाची कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच १५ ऑक्टोबरपर्यंत टोलनाका परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर या टोलनाक्याचे कंत्राट रद्द करण्यात येईल अशी माहिती दिली.

या बैठकीस माजी आमदार जयंत जाधव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त महानगर आयुक्त के. गोविंदराज, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अन्शुमली श्रीवास्तव, व्यवस्थापक एम. के. वाठोरे, रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता आर. ए. डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनावणे, आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: October 15 ultimatum for highway repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.