द्राक्षांच्या आॅक्टोबर छाटणीस कसबे सुकेणे परिसरात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:03 PM2020-09-26T16:03:32+5:302020-09-26T16:04:04+5:30
कसबे सुकेणे : नैसर्गिक संकटाचा सामना करत व कोरोनाशी लढाई देत द्राक्षउत्पादक यंदा पुन्हा नव्या उमेदीने द्राक्षबागांची आॅक्टोबर छाटणी करत आहेत. कसबे सुकेणे परिसरात या छाटणीला प्रारंभ झाला असुन द्राक्ष फळधारणेसाठी ही छाटणी महत्वपूर्ण असल्याने द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.
कसबे सुकेणे : नैसर्गिक संकटाचा सामना करत व कोरोनाशी लढाई देत द्राक्षउत्पादक यंदा पुन्हा नव्या उमेदीने द्राक्षबागांची आॅक्टोबर छाटणी करत आहेत. कसबे सुकेणे परिसरात या छाटणीला प्रारंभ झाला असुन द्राक्ष फळधारणेसाठी ही छाटणी महत्वपूर्ण असल्याने द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.
निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे सह परिसरातील विविध गावात शरद सिडलेस, थॉमसन, फ्लेम, नानासाहेब परपल या जातींच्या द्राक्षबागांची आॅक्टोंबर छाटणी सद्या सुरु झाली असुन आॅक्टोंबर-नोव्हेंबर या छाटनीनंतर पाच महिन्यानंतर द्राक्ष काढणीसाठी येतात. सध्या असमतोल निसर्ग बदलामुळे डावणी, करपा याची जास्त शक्यता असल्याचे सांगितले.
सुकेणेसह तालुक्यात २० ते २५ टक्के द्राक्षबागांची छाटणी सुरु असुन आक्टोबर छाटनीनंतर शेतकऱ्यांना प्रति एकर सुमारे दोन ते सव्वा दोन एकर रु पये खर्च अपेक्षित असतो, त्यानुसार द्राक्षउत्पादक आर्थिक गुंतवणूक करु न पुन्हा नवीन हंगामासाठी सज्ज होत आहे.
गेल्या वर्षी तोटाच तोटा...
नाशिक जिल्हयात विशेषत: निफाड, दिंडोरी, नाशिक आणि चांदवड या भागातील द्राक्ष खुडणी ही फेब्रुवारी ते मे दरम्यान होते, परंतु याच दरम्यान कोरोनाचा लॉकडाऊन झाल्याने निर्यात आणि देशांतर्गत सीमा बंद झाल्याने नाशिकच्या द्राक्षांना देशातील व परदेशातील बाजारपेठ मिळालीच नाही, त्यामुळे द्राक्षउत्पादकांनी यंदा पिकविलेले द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल भावाने स्वत: विकली. त्यामुळे कोरोनाचा पिहला मोठा आर्थिक फटका आण ितोटा हा नाशिक जिल्ह्यातील द्राक्षउत्पादकांंना सहन करावा लागला, गेल्या वर्षी चार नोव्हेंबर परतीचा पाऊस होता. त्यामुळे सुरु वातीच्या हंगामाच्या 80 टक्के बागांचे अतोनात नुकसान झाले होते.
गेल्या वर्षी परतीचा पाऊस आण िएक हंगामात कोरोनाचा लॉकडाऊन यामुळे उत्पादन खर्चही निघालेला नाही, यंदा काय होते कोण जाणे, परंतु कर्जाचा डोंगर डोक्यावर ठेवुन द्राक्ष उत्पादक पुन्हा या परिस्थितीशी लढा देत द्राक्षउत्पादन घेत आहे.
- ऋ षभ जाधव, युवा द्राक्ष उत्पादक, कसबे सुकेणे.