नाशिक महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:48+5:302021-01-10T04:11:48+5:30

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात टॉप फाइव्हमध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने हागणदारी मुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन ...

ODF Plus Plus Nomination to Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस नामांकन

नाशिक महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस नामांकन

Next

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात टॉप फाइव्हमध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने हागणदारी मुक्त सर्वेक्षणात ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून, सर्वेक्षणातील एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता वॉटर प्लस प्लससाठी महापालिकेची आणखी एक परीक्षा हेाणार असून, ती उतीर्ण झाल्यास स्वच्छ शहर सर्वेक्षणात अपेक्षित बाजी मारली जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेला शनिवारी (दि.९) हे प्रमाणपत्र मिळाल्याने, मोठे यश मिळाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ.कल्पना कुटे यांनी दिली.

उघड्यावर शौचास प्रतिबंध असल्याने त्या संदर्भातील ही पाहणी होती. त्यासाठी गेल्या महिन्याच्या अखेरीस शहरात केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक दाखल झाले होते. त्यांनी निकषानुसार पाहणी करताना, अगदी पहाटे पाचपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध भागांची पाहणी केली, तसेच नागरिकांचा प्रतिसादही तपासला. व्यावसायिक, रहिवासी आणि झोपडपट्टी क्षेत्रात प्रात:र्विधीची काय सोय आहे की सोय नसल्याने नागरिक उघड्यावर शौचासाठी जातात, काही निवडक रस्त्यांवर नागरिक अशाच प्रकारे लघुशंका करतात का, अशा पाहणीबरोबरच त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी केंद्रांनाही भेट दिली होती. सार्वजनिक शौचालयांचीही तपासणी केली हेाती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना भेटून थेट प्रश्न करण्यात येत होते. त्यामुळे तेथे थेट पारदर्शकपणे पथकाला माहिती दिली. या पथकानेही योग्य पद्धतीने काम करावे, यासाठी शासनाने विशेष दक्षता घेत जीपीएस सीस्टिमचीही व्यवस्था केली हेाती. त्यानंतरही महापालिकेची कामगिरी सरस आढळल्याने अखेरीस महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे.

कोट..

स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेची परीक्षा सुरू झाली असून, त्यातील पहिल्या टप्प्यात ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळविले आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी ही मूळ स्पर्धा होती. आता वॉटर प्लस प्लससाठी मनपा प्रयत्न करणार असून, त्यात मिळणारे यशही अंतिम सर्वेक्षणात यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

- डॉ.कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Web Title: ODF Plus Plus Nomination to Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.