ओढा, कोटमगाव ग्रामपंचायतींनी साधले जनहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:21 PM2020-06-22T23:21:14+5:302020-06-22T23:21:40+5:30
नाशिक : गाव करी ते राव काय करी असे म्हटले जात असले तरी, त्याची प्रचिती नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतीने दिली आहे. केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली असून, त्याचीच दखल घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कचरामुक्त गाव, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या उपाययोजना व ग्रामपंचायतीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न अन्य ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

ओढा ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३३२१ इतकी असून, गावाच्या विकासासाठी ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. गावात उल्लेखनीय कामकाजात प्रामुख्याने १०० टक्के भूमिगत गटार बांधकाम, कचरामुक्त गाव, ग्रामपंचायतमार्फत आरोग्य केंद्रामध्ये सॅनेटरी पॅड वेंडिग मशीन बसविण्यात आले असून, जलसंधारणांतर्गत गावातील पाझर तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या संगणकीकरणांतर्गत सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असून, बायोगॅस संयंत्र, गावातील सर्व नागरिकांना पाणी शुद्धीकरण केंद्रामधून पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाण्याचा लाभ, डिजिटल शिक्षणांतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळेस संगणक व प्रोजक्टर, दर शनिवारी भरणाºया आठवडे बाजार तळासाठी ओटे, उत्पन्न वाढीकरिता बहुउद्देशीय इमारत बांधण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने केलेल्या याकामांची दखल घेत यापूर्वी ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार’देखील मिळाला असून, याकामी सरपंच विष्णू रामभाऊ पेखळे, उपसरपंच शशिकांत सहाणे व ग्रामसेवक दौलत पांडुरंग गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. ग्रामपंचायतीने विकासकामे करून केला गावाचा कायापालट कोटमगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या १५७५ असून, गावाचा कायापालट करताना अनेक कामे करण्यात आली आहेत. त्यात गावात वृक्षलागवड, जलशुद्धीकरण केंद्र, डिजिटल शाळा व अंगणवाडी, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम, गावातील महिला, मुलींसाठी सॅनिटरी पॅड वितरण व विल्हेवाट मशीन, कुपोषित बालकांसाठी नियमित आरोग्य चाचणी आदी योजना राबविण्यात आल्या आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी केलेल्या कामांची दखल घेत ‘निर्मलग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच बाळकृष्ण म्हस्के उपसरपंच समाधान रंगनाथ जाधव व ग्रामसेवक बाळासाहेब कदम यांनी याकामी विशेष कामगिरी केली आहे.