मर्यादेनंतर फटाके फोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:34 AM2018-11-16T01:34:32+5:302018-11-16T01:35:53+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सणाच्या काळात रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास अनुमती दिलेली असताना छटपूजेनिमित्ताने पंचवटीतील इंद्रकुंड भागात मध्यरात्री उशिरा मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाºया तरुणाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सणाच्या काळात रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास अनुमती दिलेली असताना छटपूजेनिमित्ताने पंचवटीतील इंद्रकुंड भागात मध्यरात्री उशिरा मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाºया तरुणाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशकात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार हवालदार रवींद्र आढाव पोलीस वाहनातून पोलीस कर्मचाºयांसमवेत गंगाघाटावर रात्री एक वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना साईबाबा मंदिराजवळ फटाके फोडण्याचा आवाज येत असल्याचे पाहून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एक युवक हातात पिशवी घेऊन पळू लागला.